Home /News /maharashtra /

Pune News : पुण्यात रॉटव्हीलर श्वानाने घेतला निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला चावा, या दोघांविरोधात तक्रार दाखल

Pune News : पुण्यात रॉटव्हीलर श्वानाने घेतला निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला चावा, या दोघांविरोधात तक्रार दाखल

सुनील कलगुटकर सहाय्यक आयुक्त म्हणून पुण्यातून निवृत्त झालेले असून ते बाणेर परिसरात राहतात.

  पुणे, 1 जुलै : पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रॉटव्हीलर जातीच्या श्वानाने (Dottweiler Dog) एका माजी सहायक पोलीस आयुक्त (ACP) आणि त्यांच्या श्वानाचा (Dottweiler Dog bite ACP Pune) चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेबाबत निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर यांनी तक्रार दिली. नेमकी काय आहे घटना - सुनील कलगुटकर सहाय्यक आयुक्त म्हणून पुण्यातून निवृत्त झालेले असून ते बाणेर परिसरात राहतात. त्यांच्याकडे एक श्वान आहे. तर, भगत हेदेखील याच परिसरात राहण्यास आहेत. रॉटव्हीलर श्वानाला रहिवाशी भागात ठेवण्यास कायद्याने बंदी आहे. तरीही भगत यांनी या श्वानाला रहिवासी भागात ठेवले. दरम्यान, बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कलगुटकर हे श्वानाला घेऊन फिरायला गेले होते. त्याचवेळी तुषार भगत यांनी त्यांच्या रॉटव्हीलर श्वानाला मोकळे सोडले होते. यावेळी या रॉटव्हीलर श्वानाने कलगुटकर आणि त्यांच्या श्वानाचा चावा घेतला. यात ते दोन्ही गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी घडली. हेही वाचा - पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता एकदिवसाआड होणार पाणीपुरवठा, 4 जुलैपासून अंमलबजावणी सुरू
  बाणेर येथील विरभद्र नगरमधील गल्ली क्रमांक तीनच्या रस्त्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी रॉटव्हीलर श्वानाचे मालक तुषार भगत आणि त्यांच्या वडिलांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार राहीगुडे पुढील तपास करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Dog, Police, Pune

  पुढील बातम्या