मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने पुण्यातील नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार, 4 वर्षे सुरू होतं शोषण

चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने पुण्यातील नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार, 4 वर्षे सुरू होतं शोषण

 मुलगी घरी एकटीच असताना तो घरात शिरला. त्याने बॉटलमधून आणलेले पाणी तिला पाजले. त्यानंतर चक्कर येऊन तिला झोप आली.

मुलगी घरी एकटीच असताना तो घरात शिरला. त्याने बॉटलमधून आणलेले पाणी तिला पाजले. त्यानंतर चक्कर येऊन तिला झोप आली.

Rape in Pune: पुण्यातील हडपसर परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका 25 वर्षीय अभिनेत्रीवर बलात्कार (Rape on actress) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 19 डिसेंबर: पुण्यातील हडपसर परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका 25 वर्षीय अभिनेत्रीवर बलात्कार (Rape on actress) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं विविध चित्रपटात काम देतो, फोटोशूट कंपनी स्थापन करू अशी विविध प्रकारची आमिषं दाखवून पीडित तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आरोपीनं पीडित तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral obscene photos) देत दहा लाख रुपयांची खंडणी (Demand 10 lakh) मागितली आहे. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीनं वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी बलात्कार, ब्लॅकमेल आणि खंडणी अशा विविध कलमाअंतर्गत मुख्य आरोपीसह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. राजेश माल्ल्या, अभिजित गणपत साठे आणि त्याची औंध येथील बहीण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहे. आरोपी राजेश याची मुंबईत मेमर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंट नावाची कंपनी असून ही कंपनी चित्रपटांना कॅमेरा आणि लाईटींगचे साहित्य भाड्याने द्यायचं काम करते. यामुळे अनेक दिग्दर्शकांशी आरोपींची ओळख आहे.

हेही वाचा-वाढदिवशी तरुणाची आत्महत्या; पार्टीवरुन घरी आला आणि घेतला गळफास!

फिर्यादी तरुणीनं काही लघुचित्रपटात काम केलं आहे. तसेच मॉडेल म्हणूनही काही प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. यातूनच फिर्यादीशी मुख्य आरोपी अभिजित साठे याच्याशी ओळख झाली होती. आरोपीनं विविध प्रकारची आमिषं दाखवत अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडितेसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित करून अश्लील फोटो क्लिक केले आहेत. संबंधित फोटो व्हायरल करण्याची आणि चित्रफित बनवण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेकडे दहा लाखांची खंडणी मागितली आहे.

हेही वाचा-Alert! श्रीमंत तरुणांना हेरतात, मग अश्लील VIDEOने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढतात

विशेष म्हणजे यापूर्वी देखील आरोपीनं चित्रपटात काम देतो, फोटोशूट कंपनी काढू अशा भूलथापा मारून फिर्यादीकडून 6 लाख 41 हजार रुपये उकळले आहेत. याशिवाय पुण्यातील एका महिला वकीलाने हे प्रकरण मिटवण्यासाठी जबरदस्तीने नोटरी करून घेतल्याचा आरोपही पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune, Rape