पुणे, 22 मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांची आज पुण्यात सभा (Raj Thackeray Rally in Pune) पार पडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) येथे ही सभा झाली. या सभेसाठी पोलिसांकडून 13 अटी आणि शर्थी लागू केल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मुन्नाभाई' संबोधत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देणार का?, मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात पुढील भूमिका काय असणार ? तसेच अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण यांचं आव्हान राज ठाकरे स्वीकारणार का? या सर्व विषयांवर राज ठाकरे आज काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पाहुयात राज ठाकरे यांनी आपल्या सभेत नेमकं काय म्हटलं आहे.
Raj Thackeray Rally UPDATES:
माफी मागायला लावणारे 15 वर्षे गप्प का बसले?
राज ठाकरेंनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर भाष्य करत म्हटलं, माफी मागण्याविषयी इतक्या वर्षांनी जाग का आली? माफी मागायला लावणारे गेली 15 वर्षे गप्प का होते. गुजरातमधून अल्पेश ठाकूर ने परप्रातियांना हकाललं तिथे कुणाला माफी मागायला लावली तुम्ही असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांचा दौरा स्थगित करण्यावरुन विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. पण आज अखेर याबाबत स्वत: भाष्य केलं आहे. आज राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत म्हटलं, माझ्या पायाचं दुखणं सुरू आहे. त्यामुळे कमरेला त्रास होतो. म्हणून मी पुण्यातून मुंबईला गेलो. डॉक्टरांशी बोललो, तर येत्या 1 तारखेला शस्त्रक्रिया करतोय. पायाचं दुखणं सुरू आहे त्यामुळे कमरेला त्रास होतोय. ...मुद्दाम सांगितलं नाहीतर पत्रकार नको ते अवयव काढतील.
राज ठाकरेंनी म्हटलं, राणा दाम्पत्य... मी सांगितलं काय होतं की, जर मशिदीबाहेर जोरात भोंगे वाजले तर त्याच्यासमोर हनुमान चालिसा लावा. अनेक ठिकाणी लावली गेली. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा लावण्याचं बोलू लागले. आणि मग ते इतकं प्रकरण झालं की, त्यांना अटक झाली. मग ते जेलमध्ये होते... मग ते मधू इथे चंद्र तिथे... या सर्व गोष्टींनंतर ते एकत्र आले त्यांना सोडून देण्यात आलं. शिवसेनेकडून त्यांना बोलण्यात आलं ते सुद्धा शिवसेनेविरोधात बोलत होते. इतका सर्व राडा तुम्ही सर्वांनी टीव्हीवर पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेत काम करणारे लोक आहेत... जे शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत त्यांना या सर्व गोष्टींचं काहीच वाटत नाही का?
ज्यांना माझ्या दौऱ्याची तारीख खुपली, त्यांनीच या संदर्भात सर्व आराखडा तयार केला.
अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली.
अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने सापळा रचला गेला आहे.
राज ठाकरे सभास्थळी दाखल, थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात होणार
राज ठाकरे सभास्थळाकडे रवाना
अमित ठाकरे सभास्थळी दाखल, थोड्याच वेळात राज ठाकरे सभास्थळी पोहोचणार
राज ठाकरेंच्या निशाण्यावर आज कोण? राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांच्या नजरा
राज्यातील विविध भागांतून मनसेचे कार्यकर्ते पुण्यात सभेसाठी दाखल
गणेश कला क्रीडा मंचची बैठक क्षमता 3000 खुर्च्यांची आहे. आणखी एक हजार खुर्च्या आणि 500 जणांची सोफा अशी एकूण साधारण पाच हजार जणांची बैठक व्यवस्था करण्यात आली
सकाळी 10 वाजता सुरू होणार सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात आज सभा
वाचा : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत मोठी बातमी, दौरा तूर्तास स्थगित
गणेश कला क्रीडा मंचची क्षमता 3000 खुर्च्यांची आहे. आणखी एक हजार खुर्च्या आणि 500 जणांची सोफा अशी एकूण साधारण पाच हजार जणांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. लिमिटेड बैठक व्यवस्था असल्यामुळे पासेस देण्यात आले आहेत. सभेची वेळ सकाळी 10 वाजताची दिली आहे. मात्र साधारण सभा सुरू व्हायला 11 वाजतील.
राज ठाकरेंच्या सभेला 13 अटींवर परवानगी
पोलिसांनी सभेला परवानगी दिली असली तरी राज ठाकरेंच्या सभेसाठी काही अटी-शर्थी देण्यात आल्या आहेत. या नियमांचं उल्लंघन केलं तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.
1 सदर सभा ही 22-05-2022 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात आली असून कार्यक्रम स्थळ आणि वेळेत बदल करू नये.
2 सभेत सहभागी होणाऱ्या वक्त्यांनी भाषण करताना दोन समाजामध्ये धार्मिक, जातीय तेढ निर्माण होणार नाही, तसेच विशिष्ट समाजाच्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.
3 सभेदरम्यान कोणत्याही व्यक्तीचा किंवा समुदायाचा वंश, जात, भाषा, प्रदेश, जन्मस्थळ किंवा ते पाळत असलेल्या रूढी परंपरांचा अपमान होणार नाही किंवा त्यांना चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
4 सभेत सामील होणारे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक यांनी स्वयंशिस्त पाळावी, तसेच सभास्थळी वेगवेगळ्या भागातून येताना किंवा जाताना इतर धर्म/जात/पंथ यावर टीका-टीप्पणी तसेच कार्यक्रमस्थळी हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाहीत. तसेच सभेच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य, खाणाखुणा तसेच निशाणा दाखविणार नाहीत.
5 कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटकं पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शन करू नये. शस्त्र अधिनियमातील कायदेशीर तरतूदींचं उल्लंघन होणार नाहीत, याची काळजी घेतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, MNS, Pune, Raj Thackeray