Home /News /maharashtra /

Raj Thackeray Rally in Pune: मनसेचं ठरलं, पुण्यात 'राज' गर्जना होणारच..., पाहा कुठे आणि कधी होणार राज ठाकरेंची सभा

Raj Thackeray Rally in Pune: मनसेचं ठरलं, पुण्यात 'राज' गर्जना होणारच..., पाहा कुठे आणि कधी होणार राज ठाकरेंची सभा

Raj Thackeray rally in pune: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

पुणे, 19 मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची पुण्यात सभा (Pune Rally) होणार की नाही याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. कारण, राज ठाकरेंची सभा पुण्यात होणारच असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यात होणाऱ्या सभास्थळाबाबत मनसे नेत्यांकडून पाळली जातीय प्रचंड गोपनीयता पाळली जात असल्याचं दिसून येत आहे. (Raj Thackeray Pune Rally updates) पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा या आठडयाच्या शेवटी होईल. पुण्यात दोन ठिकाणच्या परवानगी आमच्या हातात आहेत, त्यामुळे सभा होणारच. दुपारी चार नंतर तारीख आणि स्थळ राज ठाकरे स्वतः कळवतील. वाचा : राजकीय वातावरण तापवणारे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 22 मे म्हणजेच रविवारी राज ठाकरेंची सभा होण्याची दाट शक्यता आहे. गणेश कला क्रीडा रंगमंदिरात सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांनी बुकिंग केली असल्याने बंदिस्त सभागृहात सभा होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये. पुण्यात मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळालं. शिवाजीनगरचे मनसे पदाधिकारी यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर चक्क झटापटीत झालं असल्याचं समोर आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या संदर्भात आयोजित बैठकीत निमंत्रण न दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांत वाद झाला. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, चक्क झटापटही झाली. रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असुन कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही याचा जाब शैलेश विटकर यांनी बैठकीत विचारला. यानंतर संतापलेले रणजित शिरोळे हे अंगावर धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व नेत्यांसमोर हा वाद झाला. अयोध्या दौऱ्यासंबंधी नावनोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकी दरम्यान हा वाद झाला. या प्रकारामुळे मनसेची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: MNS, Pune, Raj Thackeray

पुढील बातम्या