मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवस्मारकासाठी राजभवनच योग्य जागा, संभाजी ब्रिगेडची भूमिका

शिवस्मारकासाठी राजभवनच योग्य जागा, संभाजी ब्रिगेडची भूमिका

राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. संभाजी ब्रिगेड राज्यपालांच्या या वक्तव्यावर चांगलीच आक्रमक झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 23 नोव्हेंबर :  राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. संभाजी ब्रिगेड राज्यपालांच्या या वक्तव्यावर चांगलीच आक्रमक झाली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते पुण्यात बोलत होते.  राज्यपाल कोश्यारी आम्हाला महाराष्ट्रात नकोत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रव्यवहार केला मात्र उत्तर आलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं आखरे यांनी? 

राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राज्यपाल कोश्यारी आम्हाला महाराष्ट्रात नकोत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रव्यवहार केला, मात्र उत्तर आलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराजांची बदनामी खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच शिवस्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे. शिवस्मारक जमिनीवर व्हावे, आणि त्यासाठी योग्य जागा ही राजभवन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंवर निशाणा 

दरम्यान यावेळी मनोज आखरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून खोटा इतिहास दाखवण्याचं काम सुरू आहे. खोटा इतिहास मांडण्याचं काम केलं जातंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील त्यांना समर्थन देत आहेत. छत्रपतींचा इतिहास जिथं विकृत केला गेला तिथं राज ठाकरे आहेत. खोटा इतिहास पेरण्याची सुपारी घेतली आहे का? छत्रपती सगळ्या जातीचे आहेत. हिंदू आणि मुस्लिम दंगली पसरवण्याचं काम राज ठाकरेंनी केलं आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे.

First published: