Home /News /maharashtra /

पाणीकपातीनंतर पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, दमदार पावसानंतर धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात

पाणीकपातीनंतर पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, दमदार पावसानंतर धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात

पुण्यातल्या धरण साखळीत पाण्याची पातळी घसरल्याने पुणे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता होती.

    पुणे, 2 जुलै : नुकताच पुण्यात पाणीकपातीचा (Water Cut in pune) निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यात आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी (Good news for pune citizens) आहे. पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दिवसभर संततधार होती. त्यामुळे या धरणांमध्ये सध्या 2.53 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. पुणे शहरात आणि परिसरात पावसाची कमतरता आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. म्हणून पुढील आठवड्यात 4 जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल आणि त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. जलसंपदा विभागाने दिली ही माहिती - पाणी कपातीच्या निर्णयानंतर गुरुवारी रात्री पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत खडकवासला धरण क्षेत्रात चार मिलीमीटर, पानशेत धरण परिसरात 21 मिलीमीटर, वरसगाव धरण क्षेत्रात 20 मिलीमीटर; तर टेमघर धरण परिसरामध्ये सर्वात जास्त 38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरण क्षेत्रात 4 आणि पानशेत धरण क्षेत्रात 21 मिलीमीटर पाऊस पडला. तसेच वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या परिसरात अनुक्रमे 20 आणि 38 मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. हेही वाचा - पुण्यातल्या दोन मुलांची आई असलेल्या प्रीतीची विश्वविक्रमी सायकलवारी; लेह-मनाली एकटीने 55 तासांत केलं पार पुणे मनपा प्रशासनाने घेतला आहे हा निर्णय - पुण्यातल्या धरण साखळीत पाण्याची पातळी घसरल्याने पुणे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता होती. त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून आता पुण्यात सोमवार, 4 जुलैपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. याबातचा निर्णय पुणे मनपा प्रशासनाने (PMC) घेतला आहे. या पार्श्वभूमीवर धरण परिसरात पावसाला सुरुवात झाल्याने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Pune rain, Water

    पुढील बातम्या