मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात आभाळ फाटल्यासारखा पाऊस, विदर्भातली धुवांधार! ही ढगफुटी नाही, तर मग काय? पाहा VIDEO

पुण्यात आभाळ फाटल्यासारखा पाऊस, विदर्भातली धुवांधार! ही ढगफुटी नाही, तर मग काय? पाहा VIDEO

या पावसाला ढगफुटी म्हणता येणार नाही, असं ब्रिटीश युनिव्हर्सिटीत भारतीय हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी सांगितलं. वादळी पाऊस तुमच्यापासून किती दूर आहे हे विजेच्या कडकडाटापासून कसं ओळखायचं हे त्यांनी सांगितलंय. पाहा VIDEO

पुढे वाचा ...
मुंबई, 12 सप्टेंबर: पुण्यात रविवारी आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळला. अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. नाले आणि ओढ्यांना पूर आला. दोन दिवस आधी मुंबईसह उपनगरांतही विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने दैना उडवली होती. ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि नवी मुंबई भागांत तर पावसाने कहर केला होता. ढगफुटीसारखा पाऊस असंच या पावसाबद्दल वाटत होतं. पण हवामान तज्ज्ञ मात्र याला ढगफुटी म्हणत नाहीत. मग हा कसला पाऊस? परतीचा पाऊस  की मान्सूनचा पाऊस की आणखी काही? ब्रिटनच्या रीडिंग युनिव्हर्सिटीत हवामान शास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी या पावसाचं विश्लेषण केलं. त्यांनी News18Lokmat Digital ला दिलेल्या माहितीनुसार, या पावसाला ढगफुटी म्हणता येणार नाही. कारण ढगफुटीची तीव्रता याहून अधिक असते. ढगफुटी ही ठराविक भागापुरतीच मर्यादित असते. कमी क्षेत्रफळात कमी वेळात पडलेला प्रचंड पाऊस किंवा जलप्रपात म्हणजे ढगफुटी. साधारण तासाभरात 100 मिमी पाऊस आणि तोही विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह येतो त्याचं विश्लेषण ढगफुटी असं होऊ शकतं. ढगांची उंची, क्षेत्रफळ अशा अने गोष्टी यामध्ये येतात. मग पुण्या मुंबईसह नागपूर आणि विदर्भात सर्वदूर जो अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडतोय त्याला काय म्हणायचं? डॉ. देवरस यांच्या मते हा वादळी पाऊसच. मान्सून दरम्यान कमी-जास्त तीव्रतेच्या दाबामुळे असा वादळी पाऊस पडू शकतो. पण तो एकाएकी क्षणार्धात येत नाही.

Weather Updates: पुण्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; राज्यभरात धो-धो कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट

डॉ. अक्षय देवरस यांनी वीज आणि गडग़डाट यांच्या तीव्रतेवरुन वादळी पावसाची तीव्रता कशी ओळखावी, याबाबत माहिती दिली आहे. साधारणपणे हा वादळी पाऊस दुपारनंतर येतो. दुपारी कडक ऊन पडतं आणि तुम्ही बाहेर असाल तर लक्षात येईल अशा पद्धतीने आकाशात एका दिशेने काळे ढग जमू लागतात. ठराविक दिशेने अंधार दाटत येतो आणि विजा चमकू लागतात. ढगांचा गडगडाट सुरू होतो. वीज चमकते आणि त्यानंतर काही क्षणांनी ढग गडगडतात. या फरकावरून वादळ तुमच्यापासून किती दूर आहे याचा अंदाज बांधता येतो. सरधोपट असला तरी वादळी पावसापासून वाचण्यासाठी असा अंदाज उपयुक्त ठरू शकतो. वीज चमकल्यानंतर किती सेकंदांनी ढगांचा आवाज ऐकू येतोय त्या संख्येला तीनने भागलं की जे उत्तर येईल तितक्या दूर वादळाची तीव्रता आहे, असं समजावं. म्हणजे समजा वीज चमकल्यानंतर 6 सेकंदांनी ढग गडगडले. तर 6 भागिले 3 म्हणजे 2 किलोमीटरवर तीव्र स्वरूपातले वादळी ढग आहेत. अशा वेळी तुम्ही आहात त्या ठिकाणी थांबणं सुरक्षित असतं. वादळी ढग साधारण तासाभरात 15 किलोमीटर प्रवास करतात, असं मानलं तरी तुमच्यापासून वादळी ढग जवळ असतील तर वेळीच सुरक्षित आसरा घेतलेला बरा. हवामान खात्याने तब्बल 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे निसर्गाची ही लहर आणखी काही काळ सहन करावी लागेल हे नक्की.
First published:

Tags: Pune, Pune rain, Rain, Weather forecast

पुढील बातम्या