पुणे 05 नोव्हेंबर : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचार सभेत बोलताना शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. काही नेत्यांनी शेतक-यांच्या मालकीचे कारखाने संपुष्टात आणले असून खाजगी कारखाने उभारणीवर भर दिला, असा आरोप करत विखे पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता चांगलाच समाचार घेतला.
यावेळी विखे पाटील यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला. आमचं अपयश दाखविण्यापेक्षा तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून जातात यापेक्षा दुसरं अपयश नसल्याचे सांगत विखे पाटलांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर हल्लाबोल केला. जयंत पाटील स्वप्नरंजन करताl पण अजित पवारांनीही वास्तव्याला सामोरे जायला हवं आणि अजित पवारांनी कायम विरोधी पक्षनेते म्हणून राहावं, असं म्हणत विखे पाटलांनी चिमटे काढलेत.
माझं काम फत्ते झालं.. मुक्ताईनगरची सभा रद्द झाल्यानंतरही सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी विखे पाटील शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने काहींनी संपवले. कारण यांना आपले खाजगी कारखाने वाढवायचे होते. केंद्रात कोण होतं? याचंच सरकार होतं, असं सांगत विखे पाटील यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली.
यापुढे कोणताही सहकारी साखर कारखाना खाजगी होणार नाही हे भाजप सरकारचं धोरण असून केंद्र सरकार सहकार टिकवण्यासाठी नवनवीन धोरणं अंमलात आणत आहे. त्यामुळे घाबरायचं कारण नाही, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिला. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारच्या सहकाराच्या चुकीच्या धोरणाचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
जळगावात राजकीय वातावरण पेटणार, सुषमा अंधारे नजरकैद तर सभा घेण्याचा पवित्रा कायम
यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही निशाणा साधला. विखे पाटील म्हणाले, की मागच्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे भाषणं करतात. विरोधकांवर भडकावू भाषण करुन त्यांनी स्वतःचाच शिमगा केला आहे. यातून प्रसिद्धी मिळतेय, मात्र त्यांमी आपल्या राजकारणातला कार्यकाळ किती हे पाहून भाषणं करताना तारतम्य ठेवण्याची गरज असल्याचा सल्ला विखे पाटलांनी सुषमा अंधारेंना दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.