मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune: परमेश्वर आला तरी... पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या वादावर आयोजकांचा मोठा खुलासा

Pune: परमेश्वर आला तरी... पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या वादावर आयोजकांचा मोठा खुलासा

Purushottam Karandak : पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही संघाला हा करंडक देण्यात येणार नाही. परिक्षकांच्या या निर्णयावर आयोजकांनी खुलासा केला आहे.

Purushottam Karandak : पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही संघाला हा करंडक देण्यात येणार नाही. परिक्षकांच्या या निर्णयावर आयोजकांनी खुलासा केला आहे.

Purushottam Karandak : पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही संघाला हा करंडक देण्यात येणार नाही. परिक्षकांच्या या निर्णयावर आयोजकांनी खुलासा केला आहे.

पुणे, 20 सप्टेंबर : महाविद्यालयीन आयुष्यातील नाट्य क्षेत्रात 'पुरुषोत्तम करंडक' ही सर्वात मानाची स्पर्धा समजली जाते. आपल्या महाविद्यालयासाठी 'पुरुषोत्तम करंडक' जिंकायचा अशी नाट्य क्षेत्रात धडपडणाऱ्या प्रत्येक तरूणाची इच्छा असते. त्यामुळे या एकांकिका स्पर्धेची प्रत्येक महाविद्यालयं जय्यत तयारी करत असतात.  सध्या नाटक आणि सिनेमा गाजवणारे अनेक कलाकार याच स्पर्धेतून पुढे आले आहेत. 57 वर्षांची परंपरा असलेल्या या स्पर्धेत यापूर्वी कधीही न घडलेला प्रकार घडला आहे. 57 वर्षांमध्ये पहिल्यांदाच |पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. परेश मोकाशी, हिंमाशू स्मार्ट आणि पौर्णिमा मनोहर यांनी अंतिम फेरीचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. अंतिम फेरीत सादर झालेली एकही एकांकिका पुरूषोत्तम करंडक स्पर्धेसाठी पात्र नाही, असं मत परिक्षकांनी नोंदवलं. त्यामुळे त्यांनी यंदा कोणत्याही महाविद्यालयाला पुरूषोत्तम करंडक न देण्याचा निर्णय घेतला.  या स्पर्धेच्या 57 वर्षांच्या इतिहासात हा प्रसंग पहिल्यांदाच घडला आहे. पुरुषोत्तम करंडकसह जयराम करंडक, केशवराव दाते (अभिनय), यशवंत स्वराभिनय आणि गणपतराव बोडस (दिग्दर्शन) हे पुरस्कार देखील यंदा कुणालाही देण्यात आलेला नाही. या पुरस्कारांच्या योग्येतेची एकांकिका आणि अभिनय या स्पर्धेत आढळून आलेला नाही, असं परिक्षकांचं मत आहे. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलजी (पीआयसीटी) महाविद्यालयाची एकांकिका करंडक मिळण्यास पात्र ठरलेली नसली तरी त्यांना पाच हजार एक रुपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत घडलेल्या या ऐतिहासिक घटनांचे नाट्य वर्तुळात तीव्र पडसाद उमटले.  महाविद्यालयीन तरूणांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. स्पर्धेचा बक्षीस समारंभ 23 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी आयोजक आणि परिक्षकांनी या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणीही करण्यात आली. या सर्व वादावर आयोजकांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यातील कॉलेजमध्ये क्रांतीकारी प्रयोग, IVF तंत्रज्ञानानं पहिल्यांदाच साहिवाल कालवडीचा जन्म VIDEO परमेश्वर आला तरी... या स्पर्धेचे परिक्षक परेश मोकाशी यांच्याशी Local 18 च्या प्रतिनिधीनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी या विषयावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले. 'आम्ही हा निर्णय का घेतला याचा खुलासा लवकरच करू', असे मोकाशी यांनी स्पष्ट केले. मोकाशी यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळले असले तरी आयोजकांनी यावर रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'पुरुषोत्तम करंडक कोणालाही न देता केवळ प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर करून रोख रकमेचे पारितोषिक देण्याचा नियम पूर्वीपासून होता. आजवर स्पर्धेच्या इतिहासात परीक्षकांनी असे न आढळल्याने हा अधिकार वापरला नव्हता. यंदा मात्र परीक्षकांना तसे आढळल्याने त्यांनी या अधिकारात निर्णय घेतला. पुरुषोत्तम करंडक च्या तिन्ही परीक्षकांनी दिलेला निर्णय हा अंतिम असून जरी परमेश्वर जरी आला तरी या निर्णयात बदल होणार नाही,' असे स्पष्टीकरण या स्पर्धेचे आयोजक आणि महाराष्ट्रीय कलोपासकचे सचिव राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी दिले आहे.  आयोजकांच्या या भूमिकेमुळे यंदा पुरुषोत्तम करंडक कुणालाही मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
First published:

पुढील बातम्या