पुणे, 28 नोव्हेंबर : पुणे शहराची वाढ गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे. विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं हे शहर आयटी आणि उद्योगधंद्यांचंही केंद्र झालंय. त्यानिमित्तानं शहरात वेगवेगळ्या भागातील नागरिक स्थायिक झाले आहेत. या सर्वांनी तेथील खाद्यसंस्कृतीही पुण्यात आणली. पुणेकरांनी त्याला भरभरून दाद दिल्यानं आता हे पदार्थ पुणे शहराची विविधता आणखी संपन्न करत आहेत. पुणे शहरात फक्त भारताच्या कानाकोपाऱ्यातील नाही तर विदेशातील पदार्थही मिळतात. हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्टचा चिमिनिकोन सध्या पुणेकरांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
काय आहे चिमिनिकोन?
चिमिनिकोन हे हंगेरीची राजधाना बुडापेस्टमधील लोकप्रिय स्ट्रिट फूड आहे. कोथरूडच्या करिश्मा सोसायटीच्या रस्त्यावर असलेल्या क्रंच अफेअर्स या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ मिळतो. क्रंच अफेअर्सचे मालक अनुराग मांडन यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, 'आम्ही 2018 पासून या व्यवसायात आहेत. माझा मोठा भाऊ जेव्हा बुडापेस्टला गेला होता तिथे त्याने चिमिनिकोन हा पदार्थ पहिला. तिकडे हा पदार्थ डेझर्टमध्ये मिळतो.
आम्ही जेव्हा हा पदार्थ पुण्यामध्ये सुरू केला त्यावेळेस त्याला पूर्णपणे भारतीय पद्धतीचे बनवले. चिमनिकोन हा बाहेर देशांमध्ये गोड पदार्थ म्हणून असतो. तर आम्ही त्याला इंडियन तडका देऊन पनीर टिक्का, चिकन टिक्का अशा विविध फ्लेवर्समध्ये बनवायला सुरुवात केली. हा कोण नॉर्मल साईज आणि लार्ज साईजमध्ये मिळतो. नॉर्मल साईजचा कोण हा 170 रुपयाला आहे. या आमच्या पदार्थाचे चार ठिकाणी आउटलेट असून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद मिळतो.'
राज्यातील पहिली दही भेळ 'इथं' सुरू झाली! आजही आहे सुपरहिट, पाहा Video
पुणेकरांनी देखील या विदेशी पदार्थाला कमी कालावधीमध्ये आपलंसं केलं आहे. 'मी पहिल्यांदाच इथला चिमनिकोन खात आहे. तो अतिशय क्रंची आणि टेस्टी असून मला पुन्हा पुन्हा येथे येऊन हा खायला आवडेल, अशी प्रतिक्रिया येथील ग्राहक मैथिली परब यांनी दिली.
चुलीवरुन थेट ताटात! ठिकपुर्लीची खास खवा बर्फी, Video पाहूनच तोंडाला सुटेल पाणी
गुगल मॅपवरून साभार
कुठे खाणार चिमिनीकोन?
द क्रंच अफेर्स
शॉप नंबर 30, मोमोज आणि वॉव कॅफेच्या जवळ
करिश्मा सोसायटी, कर्वे नगर, कोथरूड,
पुणे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Local18, Local18 food, Pune