Home /News /maharashtra /

छंद जोपासून थेट जागतिक स्तरावर झेप, पुणेकराची Asia Book of Record मध्ये नोंद

छंद जोपासून थेट जागतिक स्तरावर झेप, पुणेकराची Asia Book of Record मध्ये नोंद

title=

पुण्यातील एका व्यक्तिने एक वेगळाच छंद जोपासून थेट जागतिक स्तरावर आपले नाव उंचावले आहे. त्यांनी आपल्या कल्पकतेने थेट एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Asia Book of Record) नाव नोंदवले आहे.

    पुणे, 21 मे : आजची तरुणाई (Youngsters) फार कल्पक आहे. या तरुणाईला महत्वाकांक्षा आहे. त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे. (Creative Youth of India) या प्रकारच्या अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. अनेक तरुणाईने आपल्या कल्पकतेने, आपल्या छंद जोपासून थेट जागतिक स्तरावर झेप घेतली आहे. याचेच आणखी एक उदाहरण समोर आले आहे. पुण्यातील एका व्यक्तिने एक वेगळाच छंद जोपासून थेट जागतिक स्तरावर आपले नाव उंचावले आहे. त्यांनी आपल्या कल्पकतेने थेट एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Asia Book of Record) नाव नोंदवले आहे. नितीन भोईटे, असं त्यांचे नाव आहे. त्यांनी आपल्या ट्रेकिंगच्या छंदाद्वारे थेट जागतिक स्तरावर झेप घेतली आहे. नितीन यांनी नेमंक काय केलं? नितीन भोईटे यांनी देशभरातील एक हजार किल्ले फिरून त्यावरचे वेगवेगळ्या प्रकारचे दगड गोळा केले आहेत. नितिन सुभाष भोईटे यांचा जन्म 13 जुलै 1984 मध्ये झाला आहे. त्यांनी 9 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशासह तब्बल 701 किल्ले सर केले आहेत. हा रेकॉर्ड त्यांनी 12 डिसेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2021 या कालावधीत गेला. एका व्यक्तिकडून सर्वात जास्त किल्ले सर केल्याचा विक्रम त्यांनी केला आहे. तसेच असे किल्ले सर करता करता प्रत्येक किल्ल्यावर गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दगड गोळा करून आपल्यासोबत आणले, असेही नितीन यांनी सांगितले. हेही वाचा - YouTube चं नवं अपडेट, युजर्सला Video पाहताना असा होणार फायदा
    नितीन भोईटे यांनी महाराष्ट्र राज्यासोबतच कर्नाटक, गोवा, राजस्थान, दिव, दमण, गुजरात, यूपी, मध्यप्रदेश, हरियाणा अशा दहा राज्यातील एक हजार किल्ले सर केले. यातील सर्व किल्ल्यावरील दगडांचा संग्रह घरी केला आहे. त्यांच्या या छंदाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
    First published:

    Tags: Pune, Record, Travelling

    पुढील बातम्या