मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune: कुस्ती तालीम चालवणारे पैलवान नागेश कराळे हत्या प्रकरण, एक आरोपी अटकेत

Pune: कुस्ती तालीम चालवणारे पैलवान नागेश कराळे हत्या प्रकरण, एक आरोपी अटकेत

Pune wrestler nagesh karale murder case news updates: पैलवान नागेश कराळे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Pune wrestler nagesh karale murder case news updates: पैलवान नागेश कराळे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Pune wrestler nagesh karale murder case news updates: पैलवान नागेश कराळे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी चिंचवड, 25 डिसेंबर : खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव (Shelpimpalgaon) येथे पैलवान नागेश कराळे (Wrestler Nagesh Karale) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी आथा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हत्ये प्रकरणी शिवकांत शिवराम गायकवाड नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Big update in wrestler Nagesh Karale shot dead in Shelpimpalgaon Pimpri Chinchwad)

मुख्य आरोपीसह इतर दोन आरोपी फरार

या हत्या प्रकरणात शिवकांत शिवराम गायकवाड या आरोपीला अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपी योगेश दौडकर याच्यासह इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत.

काय आहे पूर्ण प्रकरण?

नागेश कराळे हे पैलवान असून ते कुस्ती तालीम चालवत असत. गुरुवारी (24 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास नागेश कराळे एका बिअर शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या आपल्या जीपमध्ये बसले. त्याच दरम्यान मागून आलेल्या चारचाकी गाडून आरोपी उतरले आणि त्यांनी नागेश याच्यावर गोळ्या झाडल्या.

पिंपरी चिंचवडमध्ये पैलवानाची हत्या;  गोळीबाराचा Live Video

या हल्ल्यात नागेश कराळे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेने परिसरता खळबळ उडाली आहे.

पुणे-पिंपरीत हत्या सत्र सुरूच

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना काही कमी होतान दिसत नाहीयेत. महिन्याभरात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये एका 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास नॅशनल हॅवी कंपनीसमोर 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मृतक मुलाचे नाव दशांत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

सांगवीत तरुणावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

18 डिसेंबर रोजी सुद्धा एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणावर गोळीबार झाला होता. पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरात असलेल्या कातेपूरम चौकात ही घटना घडली होती. या गोळीबारात पीडित तरुणाचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमधील कातेपूरम येथे 18 डिसेंबर सकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. एका तरुणावर गोळीबार करुन आरोपीने पळ काढला. या घटनेत पीडित तरुण जखमी झाला असता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव योगेश जगताप असल्याची माहिती समोर आली.

First published:

Tags: Crime, Pune