मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एका बाईनेच बाईला दिला आधार; या Video मुळे पुणे महिला पोलिसांनी जिंकली सर्वांची मनं!

एका बाईनेच बाईला दिला आधार; या Video मुळे पुणे महिला पोलिसांनी जिंकली सर्वांची मनं!

पुण्यातील दोन महिला पोलीस एका बाळाला सांभाळतानाचा हा व्हिडिओ आहे.

पुण्यातील दोन महिला पोलीस एका बाळाला सांभाळतानाचा हा व्हिडिओ आहे.

पुण्यातील दोन महिला पोलीस एका बाळाला सांभाळतानाचा हा व्हिडिओ आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  News18 Desk

पुणे, 6 ऑक्टोबर : सध्या पुणे महापालिकेच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहेत. मात्र, यादरम्यान पुण्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आणि त्याचं नागरिकांकडून कौतुकही होतं आहे. नेमका हा व्हिडिओ काय आहे, याचं का कौतुक केलं जातंय, हे वाचा.

काय आहे नेमका प्रकार -

पुण्यातील दोन महिला पोलीस एका बाळाला सांभाळतानाचा हा व्हिडिओ आहे. खरं तर हा व्हिडिओ हडपसर इथल्या एका परीक्षाकेंद्रावर शूट केला गेलाय. सध्या पुणे महापालिकेच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहेत. बुधवारी दुपारी विधी अधिकारीपदासाठी रामटेकडी इथल्या एका केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला अनेक विवाहित महिलासुद्धा परीक्षेसाठी बसल्या होत्या.

तसेच काही गरोदर महिलांसोबत काही महिला लहान बाळांना सोबत घेऊन आल्या होत्या. तसंच अनेक महिलांचे नातेवाईक सुद्धा सोबत आले होते. पुण्यातल्या हडपसर परिसरात असणाऱ्या रामटेकडी परिसरातल्या परीक्षा केंद्रावर एका चार महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Success Story: 500 रूपये कमी मिळाल्यानंतर पडली ठिणगी, आता तस्मिया देते हजारोंना नोकरी! Video

First published:

Tags: Police, Pune, Video