Home /News /maharashtra /

पुण्यातल्या दोन मुलांची आई असलेल्या प्रीतीची विश्वविक्रमी सायकलवारी; लेह-मनाली एकटीने 55 तासांत केलं पार

पुण्यातल्या दोन मुलांची आई असलेल्या प्रीतीची विश्वविक्रमी सायकलवारी; लेह-मनाली एकटीने 55 तासांत केलं पार

मस्के यांची कामगिरी भारताच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने शेअर केली आणि त्यांच्या प्रशंसनीय प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक केले. उंचीच्या ठिकाणावर ऑक्सिजन पातळी कमी असताना त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पाहा VIDEO

    पुणे, 30 जून : लेह ते मनाली हे सुमारे 430 किलोमीटरचे अंतर एकटीने 55 तास 13 मिनिटांत कापून पुण्यातील एका महिलेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. दोन मुलांची आई असलेल्या 45 वर्षीय प्रीती मस्के यांनी 22 जून रोजी सकाळी 6 वाजता वर्ल्ड एन्डेव्हरसाठी सायकल राईड मारली. सुवर्ण चतुर्भुजावर (Golden Quadrilateral) 6,000 किमी अंतर कापून सर्वात वेगवान महिला सायकलपटूचा विक्रमही त्यांच्या अगोदरच नावावर आहे. मस्के यांची कामगिरी भारताच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने शेअर केली आणि त्यांच्या प्रशंसनीय प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक केले. "कमी ऑक्सिजन उपलब्धता असलेल्या उच्च उंचीच्या प्रदेशात अल्ट्रा सायकलिंगचा प्रयत्न, हा त्या व्यक्तीकडे किती दृढता आणि दृढनिश्चय आहे हे दर्शविते," असे संस्थेने ट्विट केले आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये "@BROindia ला तुमच्या कामगिरीचा अभिमान आहे, असे म्हटले आहे. लेहमधील बीआरओचे मुख्य अभियंता ब्रिगेडियर गौरव कार्की यांनी 22 जून रोजी सकाळी 6 वाजता लेह येथून मस्के यांना हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर 24 जून रोजी दुपारी 1:13 वाजता त्यांनी बीआरओचे कमांडर कर्नल शबरिश यांच्या उपस्थितीत मनाली येथे आपली राइड संपवली. आपल्या अनोख्या कामगिरीवर आनंद व्यक्त करताना मस्के म्हणाल्या की, हे माझ्या आवडीचे काम आहे, त्यामुळे वय हा त्याच्यासाठी कधीही अडथळा ठरला नाही. आजारांवर मात करण्यासाठी मी वयाच्या 40 व्या वर्षी सायकल चालवण्यास सुरुवात केली. जर मी माझ्या भीतीवर मात करू शकले तर कोणतीही महिला हे करू शकते, असे त्या म्हणाल्या. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार मस्के यांनी त्यांच्या प्रवासात ज्या मार्गाने प्रवास केला तो 8,000 मीटर उंचीवर होता आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना हा पराक्रम करण्यासाठी 60 तासांचा अवधी दिला होता. उंचीवरील प्रवास असल्याने दम लागल्याने त्यांना वाटेत दोनदा ऑक्सिजन घ्यावा लागला. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम मस्के यांच्याकडे इतरही लांब पल्ल्याच्या सायकलिंगचे रेकॉर्ड आहेत. या कामगिरीचे कौतुक करताना तिचे क्रू मेंबर आनंद कंसल म्हणाले, "प्रीतीने सूर्य, जोरदार वारा, बर्फवृष्टी आणि अतिशीत तापमानाशी झुंज देत, उच्च उंचीवरील खडतर बदलत्या हवामानात सायकल चालवावी लागली." कंसल यांनी BRO कडून मिळालेल्या पाठिंब्याचे कौतुक केले, त्यांनी मस्के यांच्या सुरक्षेसाठी एक सॅटेलाइट फोन आणि वैद्यकीय उपकरणांसह दोन सहाय्यक वाहने तैनात केली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Pune news

    पुढील बातम्या