मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यातील धक्कादायक प्रकार! प्रोफेसर पत्नीकडून पतीवर काळी जादू? तरुणाने कोर्टात धाव

पुण्यातील धक्कादायक प्रकार! प्रोफेसर पत्नीकडून पतीवर काळी जादू? तरुणाने कोर्टात धाव

या प्रकरणाची पुण्यातील एका स्थानिक न्यायालयाने दखल घेतली आहे. या तक्रारदाराची पत्नी ही प्राध्यापिका (Professor) आहे. तिने छळ आणि काळी जादू केल्याचे आरोप तिच्या पतीने केले आहेत.

या प्रकरणाची पुण्यातील एका स्थानिक न्यायालयाने दखल घेतली आहे. या तक्रारदाराची पत्नी ही प्राध्यापिका (Professor) आहे. तिने छळ आणि काळी जादू केल्याचे आरोप तिच्या पतीने केले आहेत.

या प्रकरणाची पुण्यातील एका स्थानिक न्यायालयाने दखल घेतली आहे. या तक्रारदाराची पत्नी ही प्राध्यापिका (Professor) आहे. तिने छळ आणि काळी जादू केल्याचे आरोप तिच्या पतीने केले आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

पुणे : शहरातील एका आयटी प्रोफेसरने (IT professional) त्याच्या पत्नीसह सासरच्या मंडळींवर काळी जादू केल्याचे धक्कादायक आरोप केले आहेत. पत्नी आणि सासरच्या लोकांनी दोन मांत्रिकांच्या मदतीने त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काळी जादू (Black Magic Acts ) केली, असा गंभीर आरोप 37 वर्षीय आयटी प्रोफेसरने केला आहे.

या प्रकरणाची पुण्यातील एका स्थानिक न्यायालयाने दखल घेतली आहे. या तक्रारदाराची पत्नी ही प्राध्यापिका (Professor) आहे. तिने छळ आणि काळी जादू केल्याचे आरोप तिच्या पतीने केले आहेत. त्या आरोपांनंतर न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम 200 अंतर्गत पुढील तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारदार तरुणाने याआधीही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली होती, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. नंतर, त्याने मार्च 2022 मध्ये न्यायालयात (Court) धाव घेतली होती. या प्रकरणात न्यायालयाचा आदेश नुकताच उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरुणाने सादर केलेले पुरावे लक्षात घेऊन न्यायालयानेच सर्व आरोपींवर वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

पीडित तरुणाने आपल्या तक्रारीत लिंबू, राख व इतर साहित्याचा काळ्या जादूमध्ये नियमित वापर होत असल्याचं नमूद केलंय. त्याची पत्नी त्याला राख आणि इतर पदार्थ मिसळलेलं अन्न खायला देत होती आणि त्यामुळे त्याची तब्येत खराब व्हायची, असा आरोपही या तरुणाने केला आहे. “त्यांनी माझ्यावर घर जावई होण्यासाठी दबाव टाकला होता. परंतु, मी नकार दिल्यावर त्यांनी माझ्यावर ताबा मिळवण्यासाठी काळ्या जादूचा वापर करण्यास सुरुवात केली. मला माझ्या कपाटात लिंबू (Lemon), हिरव्या मिरच्या (Green chilies) आणि कोळशाते तुकडे (charcoals) सापडले. मी त्यांना वारंवार विनंती केली, पण ते माझं ऐकण्याच्या स्थितीत नव्हते,” असं त्या तरुणाने म्हटलंय.

दरम्यान, पत्नीविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी तक्रारदार तरुणाने पत्नीच्या मोबाइलवर कॉल व्हॉईस रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर (Call Voice Recording Software ) डाउनलोड केलं होतं. त्याद्वारे त्याने त्याच्या पत्नीने तिचे आई, वडील आणि इतर दोन मांत्रिकांशी (Occultists) केलेल्या संवादाचे कॉल रेकॉर्ड केले होते. कपाटात आढळलेलं साहित्य आणि तिच्या कॉल रेकॉर्डिंगवरून ती पतीवर काळी जादू करायची, असं प्रथमदर्शनी कळतंय. शिक्षित महिला प्राध्यापिकेने आपल्या पतीवर ताबा मिळवण्यासाठी असं कृत्य केल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune