मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : देवदर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांवर दु:खाचा डोंगर, पुण्यात पीकअप उलटली, मोठी खळबळ

VIDEO : देवदर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांवर दु:खाचा डोंगर, पुण्यात पीकअप उलटली, मोठी खळबळ

औरंगाबादच्या वारकऱ्यांसोबत मोठी दुर्घटना, शिंदवणे घाटात पीकअप उलटली

औरंगाबादच्या वारकऱ्यांसोबत मोठी दुर्घटना, शिंदवणे घाटात पीकअप उलटली

शिंदवणे घाटात वारकऱ्यांची पिकअप गाडी पलटी होऊन या अपघातात 15 वारकरी जखमी झाले आहेत. जखमींना उरुळी कांचनमधील दवाखान्यात दाखल करण्यात आलंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Chetan Patil

सुमित सोनवणे, पुणे, 6 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यात एक दुखद घटना घडली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या एका पीकअपचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली. घाटात तीव्र उतारावर गाडीला ब्रेक न लागल्याने ही दुर्घटना घडली. पीकअपला नियंत्रणात आणत असताना तिचा ब्रेक फेल झाला आणि तीव्र उताऱ्यावर गाडी उलटली. अतिशय भयानक ही दुर्घटना होती. या दुर्घटनेमुळे प्रत्यक्षदर्शी असलेले इतर वाहनचालक प्रचंड घाबरले होते. त्या घडीला नेमकं काय करावं तेच त्यांना सूचत नव्हतं. पण त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तातडीने मदत कार्याला सुरुवात केली.

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. वारकरी म्हणजे परमेश्वराचे मुलंच. वारकऱ्यांच्या अपघाताच्या या घटनेमुळे अनेकांचं काळीज पिळवटून गेलं आहे. खरंतर अपघात हा कोणताही किंवा कुणाचाही असो, तो दुर्देवीच असतो. तशी घटना घडूच नये. पुण्यात घडलेल्या वारकऱ्यांच्या अपघाताच्या घटनेवर अनेकांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात तब्बल 15 वारकरी हे जखमी झाले आहेत. तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(शिंदे कुटुंब हादरलं! गरबा पाहत असताना माहीच्या डोक्यातून उडाली रक्ताची चिळकांडी, मृत्यू)

संबंधित घटना ही शिंदवणे घाटात घडली आहे. शिंदवणे घाटात वारकऱ्यांची पिकअप गाडी पलटी होऊन या अपघातात 15 वारकरी जखमी झाले आहेत. जखमींना उरुळी कांचनमधील दवाखान्यात दाखल करण्यात आले. हे वारकरी औरंगाबादमधील असल्याची माहिती समोर येत आहे. जेजुरी देवदर्शन करून उरुळी कांचनच्या दिशेने निघाले असता शिंदवणे घाटामध्ये तीव्र उतारावर गाडीला ब्रेक न लागल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर 20 हून अधिक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.

First published: