मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेत वेटरची आत्महत्या, घटनेपूर्वी केलं होतं Facebook LIVE

Pune: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेत वेटरची आत्महत्या, घटनेपूर्वी केलं होतं Facebook LIVE

Facebook Live करत वेटरची आत्महत्या, पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

Facebook Live करत वेटरची आत्महत्या, पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

Pune waiter suicide by doing facebook live: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने फेसबूक लाईव्ह करत 13व्या मजल्यावरुन उडी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे, 20 नोव्हेंबर : पुणे शहरातून (Pune city) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरने फेसबूक लाईव्ह (Facebook Live) करत इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. (Waiter commits suicide) रेस्टॉरंट इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेत वेटरने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृतक वेचरचं नाव अरविंद सिंह राठौर असे असून तो 26 वर्षांचा होता. (Pune waiter commits suicide by jumping from 13th floor after doing Facebook Live)

आत्महत्येपूर्वी केलं Facebook Live

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अरविंद सिंह राठौर हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंट हाऊस मध्ये तो एक महिन्यापूर्वीच कामाला लागला होता. घटनेपूर्वी अरविंद याने फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवल्याचा आरोप केला व त्यामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाच सांगितले जात आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडला होता वेटर

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अरविंद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

वाचा : 'तू मला पसंत नाहीस' म्हणत महिन्याभरातच दिला तलाक मग अंगावर पेट्रोल ओतून पेटवलं

फसवणूक झाल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद याने आत्महत्येपूर्वी फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधीलच काही कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप केला आहे. फसवणूक झाल्याचा आरोप करत त्याने टोकाचं पाऊल उचलंल आणि मग इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेतली. अरविंद याच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस तपास सुरू

दरम्यान, आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अरविंद याने आत्महत्या का केली, त्या मागचं नेमकं कारण काय आहे? तसेच त्याने आरोप केल्याप्रमाणे कुणी फसवणूक केली आहे? याचा पोलीस तपास करत आहेत. यासोबतच तो मानसिक तणावात होता का? किंवा कौटुंबिक वाद होता का? याबाबतही पोलीस अधिक माहिती घेत तपास करत आहेत.

पुण्यात 3 वर्षीय चिमुकल्याला विष पाजून संपवलं, न्यायालयानं आईला दिली आयुष्यभराची शिक्षा

पुण्यातील तळवडे येथील रहिवासी असणाऱ्या एका महिलेनं 5 वर्षांपूर्वी आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून त्याची निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी पाच वर्षे सुनावणी केल्यानंतर, न्यायालयाने आपला निर्णय दिला असून दोषी आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर सात हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल सत्र न्यायाधीश जी पी अगरवाल यांनी सुनावला आहे.

स्वाती विक्रम माळवदकर असं शिक्षा झालेल्या 25 वर्षीय दोषी महिलेचं नाव असून ती पुण्यातील तळवडे येथील रहिवासी आहे. 02 ऑगस्ट 2016 रोजी तिने आपल्या पोटच्या लेकराला विष पाजून त्याची हत्या केली होती. याबाबत दोषी स्वातीचे दीर श्रीकांत माळवदकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. निगडी पोलिसांनी घटनेचा तपास केल्यानंतर, हे प्रकरणाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू होती. घटनेच्या पाच वर्षांनंतर सर्व पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने आई स्वाती यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

First published:

Tags: Crime, Pune, Suicide