Home /News /maharashtra /

पुण्यात दिवसा घरफोडी करुन 60 तोळे सोन्याची चोरी; बहिणीच्या घरात फ्रिजखाली लपवले दागिने, अशी झाली पोलखोल

पुण्यात दिवसा घरफोडी करुन 60 तोळे सोन्याची चोरी; बहिणीच्या घरात फ्रिजखाली लपवले दागिने, अशी झाली पोलखोल

अन्सारीच्या कोंढवा येथे राहणाऱ्या बहिणीच्या पतीची चौकशी सुरू करण्यात आली. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच जुनेदने अन्सारीच्या बहिणीच्या घरातील फ्रिजखाली दागिने लपविल्याचं सांगितलं.

    पुणे 05 जुलै : बिबवेवाजी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी करून भामट्याने 60 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते (Gold Theft in Pune). याप्रकरणी एकाला अटक करण्यात यश आलं आहे. यासोबतच हे दागिने लपवण्यासाठी त्याची मदत करणाऱ्या इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मुस्तफा शकील अन्सारी , जुनेद रिझवान सैफ आणि हैदर कल्लू शेख अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. Pune Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकरण आले समोर, पुण्यातील धक्कादायक प्रकार बिबवेवाडीतील सोबा सवेरा अपार्टमेंटमध्ये 20 जूनला ही घटना घडली. दिवसा तक्रारदाराच्या घराला कुलूप होतं आणि घर बंद होतं. यावेळी अज्ञात चोरट्याने इमारतीच्या टेरेसचं लॉक आणि गॅलरीला असलेलं लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला. यानंतर त्याने बेडरूममधील कपाटातील एकूण दीड लाखाची रोकड आणि 60 तोळ्यांचे दागिने चोरून नेले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून फिंगरप्रिंट विभागाची मदत घेतली. यावेळी सराईत मुस्तफा याने चोरी केल्याचं समोर आलं. पोलिसांनी अन्सारी याला ताब्यात घेतलं. यानंतर त्याच्याकडे तपास करत असताना त्याने नातेवाइकांच्या घरात हे दागिने लपवल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर अन्सारीच्या कोंढवा येथे राहणाऱ्या बहिणीच्या पतीची चौकशी सुरू करण्यात आली. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच जुनेदने अन्सारीच्या बहिणीच्या घरातील फ्रिजखाली दागिने लपविल्याचं सांगितलं. पुणे हादरलं! वहिनीवर ससून रुग्णालयात उपचार, घरी काकाने पुतण्या-पुतणीची केली भयंकर अवस्था दागिने लपवण्यासाठी आरोपीने दोन साथीदारांची मदत घेतल्याचं उघडकीस आलं. आरोपींकडून सर्व ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी दागिने लपविणाऱ्या दोघांना कोंढवा येथून तर एकाला लातूरमधून ताब्यात घेतलं. गुन्ह्यातील मुख्य आरोपी मुस्तफा शकील अन्सारी याला युनिट एकने अटक केली. त्याचा ताबा घेतल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी चोरीतील 60 तोळ्यांचे दागिने जप्त केले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Pune crime, Theft

    पुढील बातम्या