मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुणेकरांसाठी Good News: 1 डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरू; भीमथडी जत्रा, सवाई गंधर्वचा मार्ग मोकळा

पुणेकरांसाठी Good News: 1 डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरू; भीमथडी जत्रा, सवाई गंधर्वचा मार्ग मोकळा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात आढावा बैठक घेतली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात आढावा बैठक घेतली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात आढावा बैठक घेतली.

पुणे, 27 नोव्हेंबर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात जिल्हा (Pune district) आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाची (Corona) स्थिती आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे. पुण्यात 1 डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरू राहणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं आहे. (Cinema Hall, Theater will be function with full capacity in Pune from 1 December)

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांनी सांगितले की, आपण पुण्यात 1 डिसेंबरपासून नियमांचे पालन करुन पूर्ण क्षमतेने सिनेमागृह, नाट्यगृह सुरू करणार आहोत. 50 टक्के क्षमतेचे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. खुल्याजागेतील कार्यक्रम, संगीत कार्यक्रमांना देखील परवानगी असणार आहे असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

भीमथडी जत्रा, सवाई गंधर्वचा मार्ग मोकळा

1 डिसेंबरपासून पुण्यात सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. यामुळे आता पुण्यातील सवाई गंधर्व या संगीत महोत्सवाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच भीमथडी जत्रेला डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात परवानगी देण्यात आली असल्याचंही अजित पवार म्हणाले.

वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजपत गेलेले नेते स्वगृही परतण्याच्या तयारीत

राज्यात पुन्हा निर्बंध?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात विविध प्रकल्पांचा आढावा घेणारी बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, पुण्यात परिस्थिती बरी आहे पण जागतिक पातळीवर नव्या प्रकारचा व्हायरसचा फैलाव होत आहे. त्याबद्दल फार वेगवेगळ्या प्रकारची मत आहेत. मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतील. काही निर्बंध पुन्हा आणावी लागतील असं त्या क्षेत्रातल्या मान्यवरांचे मत आहे.

नव्या व्हेरिएंटला ओमिक्रॉन नाव

कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization, WHO) शुक्रवारी घातक कोरोना व्हायरसच्या B.1.1529 या नवीन स्ट्रेनला 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' (Variant of concern) म्हणून संबोधलं आणि त्याला ओमिक्रॉन (Omicron) असे नाव दिलं. या श्रेणीतील व्हायरस अत्यंत संसर्गजन्य मानले जातात.

डेल्टा व्हेरिएंट देखील त्याच श्रेणीत ठेवण्यात आला होता. हा व्हेरिएंट आढळण्यापूर्वीच युरोपातल्या अनेक देशांमध्ये आणि ब्रिटन, जर्मनी आणि रशियासह इतर प्रदेशांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत होती. रशियामध्ये या महामारीमुळे रेकॉर्ड ब्रेक लोकांचा मृत्यू झाला होता. आता हा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर जगात घबराट पसरली आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Pune