Home /News /maharashtra /

Pune Suicide Case : पुण्यात FTII मधील विद्यार्थ्याची आत्महत्या; वसतिगृहाच्या खोलीत घेतला गळफास

Pune Suicide Case : पुण्यात FTII मधील विद्यार्थ्याची आत्महत्या; वसतिगृहाच्या खोलीत घेतला गळफास

पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ टेलिव्हिजन (FTII) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

  पुणे,05 ऑगस्ट : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरूणाने आत्महत्या केली आहे. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ टेलिव्हिजन (FTII) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Pune Suicide Case)ही घटना आज (दि.05) शुक्रवारी सकाळी 09 च्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान त्याने का आत्महत्या केली याबाबत अद्यापही कारण समजू शकले नाही.

  अश्विन शुक्ला असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 'पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर असणाऱ्या एफटीआयआय मध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली.

  हे ही वाचा : सेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना निवडणुकीत पहिलं यश; सोलापूरमधून ठाकरे गटासाठी आनंदाची बातमी

  त्यानंतर डेक्कन पोलीस स्टेशनचे मार्शल घटनास्थळी दाखल झाले. अश्विन शुक्ला असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो एफटीआयआय मधील बॉईज हॉस्टेलमध्ये राहत होता. आज सकाळी नऊ वाजता त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. अश्विन शुक्ला हा मुळचा गोवा येथील रहिवासी असल्याचीही माहिती समोर आली आहे.

  एफटीआयआयमध्ये तो शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान शुक्लाच्या आत्महत्येमुळे परिसरात काहीकाळ खळबळ उडाली होती. त्याने का आत्महत्या केली यावर कोणाकडून स्पष्टीकरण आले नाही.

  हे ही वाचा : Maharashtra Rain Update : मुंबई, पुण्यासह राज्यात मुसळधार पाऊस, पुढचे 8 दिवस ‘या’ जिल्ह्याना इशारा

  एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वय 32 होते. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथील शेवटच्या वर्षात तो शिक्षण घेत होता. दरम्यान तो राहत असलेल्या वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune crime, Pune news, Pune police

  पुढील बातम्या