पुणे, 7 डिसेंबर : पुणे जिल्ह्यातील आळेफाटा (Aalephata Pune) येथे दुकानावर दरोडा (Robbery in shop) पडला आहे. चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (7 डिसेंबर) रात्री साडेदहा वाजता घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Robbery caught in cctv) झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथील बोरी बुद्रुक येथे अविनाश पटाडे यांचे साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करुन त्यांना बंदुकीचा धाक दाखविला. बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
बंदुकीचा धाक दाखवून दरोडा, आळेफाटा येथील घटना सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/vrVt9rcE2l
— News18Lokmat (@News18lokmat) December 7, 2021
काही दिवसांपूर्वीच चौदानंबर येथील अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा पडला होता, त्यामध्ये पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास अद्याप सुरूच आहे. ही घटना ताजी असतानाच आळेफाटा येथे पुन्हा बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात वारंवार अशा घडत असल्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाचा : पुण्यात एका 'गोल्डनमॅन'ची 6 गोळ्या झाडून हत्या, हत्येचा LIVE VIDEO
ऑक्टोबर महिन्यात शिरुरमधील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा
बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना ऑक्टोबर महिन्यात समोर आली होती. पुणे जिल्ह्यातील (Pune district) शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) पिंपरखेड (Pimperkhed) येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर दुपारच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला होता. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
दरोडेखोरांनी पिस्तुलीचा धाक दाखवत बँकेतून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला होता. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
सशस्त्र दरोडेखोरांकडून दुकान मालकाची निर्घृण हत्या
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या चिखली (Chikhali) शहराच्या मध्यवर्ती भागात दुकानात शिरलेल्या दरोडेखोरांनी दुकान मालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. शहरातील जयस्तंभ चौक या गजबजलेल्या परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानावर रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दोन दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दुकान मालक कमलेश पोपट यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv footage, Crime, Pune