मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune Corona : पुण्यात दिवसभरात तब्बल 5 हजार 571 नवे रुग्ण

Pune Corona : पुण्यात दिवसभरात तब्बल 5 हजार 571 नवे रुग्ण

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

पुण्यात आज दिवसभरात तब्बल 5 हजार 571 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पुणे, 13 जानेवारी : पुण्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. पुण्यात आज दिवसभरात तब्बल 5 हजार 571 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी दोन रुग्ण हे पुण्यातील होते. तर एक रुग्ण पुण्याबाहेर होता. पुण्यात सध्या 182 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 19 रुग्ण आहेत. तसेच नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 26 रुग्ण आहेत. पुण्यात दिवसभरात 2 हजार 335 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 5 लाख 42 हजार 989 इतकी आहे. तर 25 हजार 737 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी एक सामाधानाची बाब म्हणजे सक्रिय रुग्णांपैकी केवळ 4.33 टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पुण्यात काल (12 जानेवारी) दिवसभरात 4 हजार 857 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होोते. तर 1 हजार 805 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. तसेच एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली होती. पुण्यात काल दिवसभरात 33 रुग्ण गंभीर असल्याची माहिती महापालिकेकडून जारी करण्यात आली होती. पण आज हाच आकडा थेट 45 वर पोहोचला आहे. गंभीर रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांच्याकडून शर्तीने प्रयत्न सुरु आहेत.

(शरीरावर कमी की काय म्हणून डोळ्यातही टॅटू करायला गेली; मॉडेलची झाली भयानक अवस्था)

मुंबईत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही मुंबई आणि पुणे शहर सर्वाधिक बाधित ठरताना दिसत आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या आठवड्यात 20 हजारांच्या पारही गेला होता. मुंबईत दिवसभरात 13 हजार 702 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 20 हजार 849 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 88 टक्क्यांवर पोहोचलं आहे. मुंबईत सध्या 95 हजार 123 सक्रिय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे मुंबईत काल दिवसभरात 16 हजार 420 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे कालच्या तुलनेत आजच्या नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी झाल्याचं चित्र आहे.

First published: