Home /News /maharashtra /

Pune Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकरण आले समोर, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकरण आले समोर, पुण्यातील धक्कादायक प्रकार

सोशल मीडियावर (SOCIAL MIDEA) मैत्रीच्या नावाखाली मुलींसोबत फसवणूक (minor girl rape) होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

  पुणे, 05 जुलै : सोशल मीडियावर (SOCIAL MIDEA) मैत्रीच्या नावाखाली मुलींसोबत फसवणूक (minor girl rape) होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनोळखी तरुणांशी मैत्री (unknown friend) आणि नंतर वाढती जवळीक आयुष्याला अनेक वेळा उद्ध्वस्त करते. अशा अनेक घटना समोर येत आहेत. दरम्यान पुण्यात (pune crime) १५ वर्षांची मुलगी या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण इतके पुढे गेले आहे की त्यांनी प्रेमामध्ये शारिरीक संबंध (Physical contact) ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. ती प्रेग्नंट (minor girl pregnant) राहिल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. याबाबत पुण्यातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, त्यानंतर आरोपीचा शोध सुरू आहे. (pune bharati vidhyapith police station)

  सोशल मीडियावर आढळून आलेले हे फसवणुकीचे प्रकरण पुण्यातील आंबेगाव ब्रुद्रुकचे आहे. येथे राहणाऱ्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहन दास नावाच्या तरुणाशी ओळख झाली. आधी दोघांमध्ये संवाद सुरू होता नंतर आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने जवळीक वाढवली आणि मग एके दिवशी तिला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

  हे ही वाचा : आमदार बच्चू कडूंना न्यायालयाचा दणका, 17 वर्षांपूर्वीचे प्रकरण काढले निकाली, 20 हजारांचा दंड

  दरम्यान हे प्रकरण पीडिता गरोदर राहिल्यानंतर घरच्यांच्यासमोर आले आहे. यानंतर कुटुंबीयांनी पिडीतेला विश्वासात घेऊन सविस्तर माहितीघेतली, त्यानंतर हे सगळे प्रकरण कोणत्या कारणातून घडले आहे याचा सविस्तर उलगडा झाला. दरम्यान कुटुंबियांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जात तक्रार दाखल केली आहे. वैद्यकीय तपासणी आणि इतर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी आरोपी रोहित दासविरुद्ध पोक्सो आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आरोपी फरार असल्याने अटक झालेली नसल्याचे समोर आळे आहे. दरम्यान पिडीतेजवळही त्याचा पत्ता नसल्याने पोलिसांना शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहे.

  हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना दणका, BMC मधील खास अधिकाऱ्यांची केली बदली

  10 दिवसांत दुसरी घटना

  अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सूरज नाना कदम (वय २३, रा. कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडीत मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगी कदमच्या ओळखीतील आहे. त्याने मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर तपास करत आहेत.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune crime, Pune crime news

  पुढील बातम्या