मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : पुरंदरच्या शेतकऱ्यांची भरारी, कयानी बेकरीसोबत केला पेरूचा केक लाँच! Video

Pune : पुरंदरच्या शेतकऱ्यांची भरारी, कयानी बेकरीसोबत केला पेरूचा केक लाँच! Video

Pune : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जगप्रसिद्ध कयानी बेकरीसोबत पेरूचा केक लाँच केला असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पुणे,19 सप्टेंबर : पुणेकर खवय्ये ज्याला दाद देतात ती गोष्ट जगभरात फेमस होते, असं म्हणातात. पुणेकरांची आवड जपण्यासाठी कयानी बेकरी प्रसिद्ध आहे. या बेकरीचे प्रोडक्ट्स गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांची पहिली पसंती आहे. जगभर कुठेही जाताना पुणेकर हे प्रोडक्ट्स घेऊन जातात. कयानी बेकरीनं पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत पेरूचा केक सुरू केला आहे. पुरंदरच्या शेतकऱ्यांनी बनवलेल्या या केकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कशी सुचली कल्पना? 'पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या फळांचं उत्पादन घेतलं जातं. ही फळ जगभर पोहचावीत यासाठी काही तरूणांनी एकत्र येऊन पुरंदर हायलाईट्स ही कंपनी सुरू केली.  गेल्या दीड वर्षांपासून फळांपासून केक बनवण्याचा प्रयोग पुरंदर हायलाईट्सच्या माध्यमातून सुरू आहे, ' अशी माहिती पुरंदर हायलाईट्सचे संचालक राहुल उरसळ यांनी दिली. पुण्यातील कयानी बेकरीने आमच्या या अभिनव प्रयोगास प्रतिसाद दिला. त्यानंतर पुरंदर पेरूच्या केकची निर्मिती करण्यात आली आहे. लाल गर असणाऱ्या पेरूपासून हा केक तयार करण्यात आला असून याची चव आणि रंग इतर केकपेक्षा वेगळा आहे,' असे उरसळ यांनी सांगितलं. पुरंदर परिसरात पिकणाऱ्या रत्नदीप या वाणाच्या पेरू लाल रंगाचा असून त्याची चव अत्यंत गोड आहे. कयानी बेकरीच्या मदतीने याच रत्नदीप पेरूपासून या एगलेस केकची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात हा केक लॉन्च करण्यात आला असून या केकला मोठी मागणी असल्याचं  बेकरीचे मालक रुस्तम कयानी यांनी सांगितलं. जेवणासोबत घ्या पुस्तकांची मेजवानी; 75 वर्षांच्या आजींचे लय भारी हॉटेल, VIDEO पुण्यातील कयानी बेकरी ही प्रसिद्ध बेकरीपैकी एक म्हणून ओळखली जाते. 1955 साली सुरू करण्यात आलेल्या या कयानी बेकरीच स्ट्रॉबेरी बिस्किटांसाठी खूप प्रसिद्ध आहे. आता त्यांनी पुरंदर पेरु केक पुण्याच्या बाजारपेठेत लाँच करुन पुढचं पाऊल टाकलं आहे. पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठीही देखील ही अभिमानाची गोष्ट आहे.  पेरु उत्पादक शेतकऱ्यांना नवा ग्राहकवर्ग या माध्यमातून मिळणार आहे.

गुगल मॅप वरून साभार

कयानी बेकरीचा पत्ता 6, डॉ.कोयाची रोड, होलसूर कॅम्प, पुणे- 411001 फोन नंबर - 020, 2636 0517
First published:

Tags: Farmer, Food, Pune

पुढील बातम्या