मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्याचं वातावरण तापलं! मनसे-युवासेना-भाजपचं आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा जाळला

पुण्याचं वातावरण तापलं! मनसे-युवासेना-भाजपचं आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा जाळला

पुण्यात पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. आज पुण्यात त्याविरोधात युवासेना आणि मनसेनं आक्रमक आंदोलन करून पाकिस्तानचा झेंडा जाळला तर भाजपने थेट पोलीस आयुक्तालयातच आंदोलन केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 25 सप्टेंबर : पुण्यात पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. आज पुण्यात त्याविरोधात युवासेना आणि मनसेनं आक्रमक आंदोलन करून पाकिस्तानचा झेंडा जाळला तर भाजपसह 12 हिंदुत्ववादी संघटनांनी थेट पोलीस आयुक्तालयातच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन देशद्रोहाचा गुन्हा करण्यासाठी निवेदनही दिलंय.

शुक्रवारी पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'ची एक घोषणा दिल्याचा आरोप होत आहे. यानंतर आज पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाबाजीने पुण्यातं वातावरण चांगलंच तापलं. याविरोधात युवासेना, मनसेसह भाजपही मैदानात उतरलं आहे.

पीएफआयच्या आंदोलनातील त्या एका घोषणेचा मुद्दा पुण्यात आता चांगलाच पेटलाय. याच मुद्यावरून रविवारी पुण्यात अतिशय आक्रमक आंदोलनं झाली. पहिलं आंदोलन झालं ते कलेक्टर ऑफिससमोर, तिथे युवासेनेच्या कार्यकर्त्यांची पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून फाडला.

इकडे अलका चौकही मनसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी दणाणून सोडला. तिथं तर पाकिस्तानचा झेंडा एकदा नाहीतर दोनदा जाळला गेला.

सेना, मनसे ही अशी आक्रमक झाल्याचं पाहून भाजपही भाया सरसावून पुढे सरसावली त्यांनी तर चक्क पुणे पोलीस आयुक्तालयातच पाकिस्तान मुर्दाबादची घोषणाबाजी केली आणि पोलीस आयुक्तांना पीएफआयवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं. यावेळी त्यांच्यासोबत संघ परिवारातल्या 12 संघटना उपस्थित होत्या.

सत्ताधारी पक्षांनीच एवढा जोर लावल्याने पोलिसांनीही त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लीप तात्काळ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून दिल्यात. तपासाअंती आवश्यक ती सर्व कलमं वाढवू, आणि दोषींवर कठोर कारवाई करू, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिलीय.

मुख्यमंत्री-गृहमंत्री काय म्हणाले?

दरम्यान कुठल्याही परिस्थितीत देशद्रोही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घटनेनंतर म्हणाले आहेत. तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

खरंतर बेकायदा जमाव गोळा केला म्हणून पुणे पोलिसांनी पीएफआयच्या आंदोलकांना त्याचदिवशी ताब्यात घेऊन सोडूनही दिलं होतं. पण त्याच आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेची एक क्लीप व्हायरल झाली आणि सगळं चित्रच बदलून गेलं.

First published: