Home /News /maharashtra /

महिला पोलिसाला मारहाण करत घेतला चावा; लोकप्रिय अभिनेत्रीला पुण्यात अटक

महिला पोलिसाला मारहाण करत घेतला चावा; लोकप्रिय अभिनेत्रीला पुण्यात अटक

अभिनेत्रीने कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला चावल्याचा आणि हल्ला केला असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रारीवरुन 28 वर्षीय अभिनेत्रीविरोधात चंदन नगर पोलीस ठाण्यात एफआय़आर दाखल करण्यात आला आहे

    पुणे 04 जुलै : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात वेब सीरिजमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे (Pune Police Arrested a Actress). अभिनेत्रीने कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला चावल्याचा आणि हल्ला केला असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रारीवरुन 28 वर्षीय अभिनेत्रीविरोधात चंदन नगर पोलीस ठाण्यात एफआय़आर दाखल करण्यात आला आहे. परवीन शेख असं या घटनेत जखमी पोलीस कर्मचारी महिलेचं नाव आहे. आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारची आहे. आरोपी अभिनेत्री ही मुंबईतील अंधेरी परिसरात राहाते. ती मुळची कर्नाटकमधील असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र पोलिसांनी तिच्या नावाचा खुलासा केलेला नाही. महिला पोलीस कर्मचारी परवीन शेख या दामिनी स्क्वाडच्या सदस्याही आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध वेबसीरिजमध्ये काम केलेलं आहे. ती पुण्यात काहीतरी कामानिमित्त आली होती. यासाठी तिने वडगाव शेरी भागातील एका हॉटेलमध्ये बुकिंग केलेलं होतं. मात्र, चांगली सुविधा न मिळाल्याचं सांगत तिने हॉटेल स्टाफकडे आपले पैसे परत मागितले. यावरुन तिथे भांडण सुरू झालं. यानंतर हॉटेलच्या स्टाफने शुक्रवारी दुपारी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पुणे हादरलं! वहिनीवर ससून रुग्णालयात उपचार, घरी काकाने पुतण्या-पुतणीची केली भयंकर अवस्था याबाबत माहिती मिळताच पुणे पोलिसांचं दामिनी पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अभिनेत्री काहीही ऐकायला तयार नव्हती. तिने महिला पोलीस कर्मचारी परवीन शेख यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. अभिनेत्रीने परवीन शेख यांना मारहाण केली आणि त्यांच्या हाताचा चावा घेतला. यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक मंजुषा मुळूक करत आहेत
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Actress, Pune police

    पुढील बातम्या