मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्यातील नामांकित सराफांना गंडा; CCTV च्या मदतीने महिला अटकेत

पुण्यातील नामांकित सराफांना गंडा; CCTV च्या मदतीने महिला अटकेत

पुण्यातील नामांकित सराफांना गंडा; महिलेचा कारनामा पाहून सर्वांनाच बसला धक्का, पाहा CCTV

पुण्यातील नामांकित सराफांना गंडा; महिलेचा कारनामा पाहून सर्वांनाच बसला धक्का, पाहा CCTV

Pune Police arrest woman in theft case: प्रसिद्ध ज्वेलर्समधून हातचलाकीने चोरी करणाऱ्या महिलेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे, 3 डिसेंबर : पुण्यातील नामांकित ज्वेलर्सला हातचलाखीने गंडा (Pune woman stole gold from reputed jewelers) घालणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आरोपी महिलेला अटक (Hadapsar Police arrest woman) केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेची ज्यावेळी चौकशी करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune Police arrest woman in theft case)

पुण्यातील चंदुकाका सराफ अँड सन्स, पुन. ना. गाडगीळ या नामांकित ज्वेलर्समध्ये आरोपी महिलेने हातचलाखीने चोरी केल्याचं उघड झालं आहे. आरोपी महिलेचं नाव पुनम परमेश्वर देवकर असे असून तिच्याकडून पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे. ज्वेलर्समधील काऊंटरवर असलेल्या व्यक्तीला सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगून त्यानंतर त्या व्यक्तीचे लक्ष विचलीत करुन सोन्याच्या अंगठी ऐवजी बनावट अंगठी ठेवत असे.

महिला ही सोन्याचे अंगठी पाहण्यास मागून, ती दाखवीत असताना हातचलाखी करून मुळ अंगठी काढून घेवून त्या ठिकाणी दुसरी बनावट अंगठी ठेवून निघून जात असल्याचे अनेक ठिकाणच्या फुटेजमध्ये दिसून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सदर संशयित महिलेची चेहरेपट्टी, हावभाव, चालण्याची पध्दत याची सखोल माहिती घेवून त्याआधारे मगरपट्टा हडपसर ते बिबवेवाडी पर्यंतचे अनेक ठिकाणचे फुटेज पाहत संशयित महिला ही बिबवेवाडीपर्यंत गेली असल्याचे दिसून आले.

वाचा : '1 लाख दे नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करु', पुणे पोलिसातील दोन अधिकाऱ्यांचे कुकृत्य उघड

आरोपी पुनम परमेश्वर देवकर ही सन 2005-06 या कालावधीत अष्टेकर ज्वेलर्स, लक्ष्मीरोड या ठिकाणी सेल्समन म्हणून दुकानात कामास होती. या ठिकाणी कामास असताना, चोरी केल्यामुळे विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. आरोपी महिलेस सराफी दुकानातील कामाचा अनुभव असल्याने सोन्याचे दागिन्यावर स्टिकर कसे लावायचे याबाबत तिला ज्ञान होते.

वाचा : 400 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचं पुणे कनेक्शन? आयकर विभागाची मोठी कारवाई

आरोपी महिला ही दुकानात दागिने पाहण्यास गेल्यानंतर सोन्याचे अंगठ्या पाहण्याचा बहाणा करत असे, व त्या दरम्यान कधी पाणी व चहाची मागणी करून सेल्समनचे लक्ष विचलीत करून आणखी सोन्याच्या अंगठ्या दाखवण्यास सांगून मुळ सोन्याची अंगठी तिचे डाव्या हातातील मोबाइल खाली लपवून तिच्याकडील बनावट सोन्याची अंगठी त्यावर यापुर्वीचे ठिकाणाहून चोरून आणलेले सोन्याचे अंगठीचे लेबल लावून ती, सोन्याचे अंगठीचे ट्रेमध्ये ठेवत असे. त्यामुळे केलेली हातचलाखी ही सेल्समनला लवकर समजुन येत नव्हती. परंतु काही दिवस गेल्यानंतर दागिन्यांची पाहणी करीत असताना घडलेला प्रकार हा फुटेजच्या आधारे उघडकीस आल्यानंतर सराफी व्यावसायिकांच्या लक्षात येत होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करुन आरोपी महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेने इतरही चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

First published:

Tags: Cctv footage, Crime, Pune