मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन

पुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन

Aadhar card

Aadhar card

तृतीयपंथीय अर्थात ट्रान्सजेंडर्समध्ये (Transgenders) मात्र आधार कार्डबद्दलची जागरूकता कमी आहे. या पार्श्वभूमीवर ट्रान्सजेंडर्सना आधार कार्ड मिळण्यासाठी पुण्यात एका विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.

पुणे, 18 मे: आधार कार्ड हे आता भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. अनेक सरकारी योजनांसाठी आधार कार्ड असणं गरजेचं असतं. देशातल्या बहुतांश नागरिकांकडे आधार कार्ड आहे. तृतीयपंथीय अर्थात ट्रान्सजेंडर्समध्ये (Transgenders) मात्र आधार कार्डबद्दलची जागरूकता कमी आहे. या पार्श्वभूमीवर ट्रान्सजेंडर्सना आधार कार्ड मिळण्यासाठी पुण्यात एका विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Bindu Queer Rights Foundation (BQRF) या संघटनेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने तृतीयपंथीयांसाठी आधार कार्ड शिबिराचं आयोजन केलं आहे. BQRF चे संचालक बिंदुमाधव खिरे (Bindumadhav Khire) यांनी सांगितलं, की पुणे जिल्ह्यातल्या अनेक तृतीयपंथीयांकडे आधार कार्ड नाही. तृतीयपंथीय म्हणून ओळखपत्र मिळण्यासाठी (Transgender Identity Card) आधार कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र आहे. त्यामुळे अशा प्रकारचं शिबिर घेण्याची गरज भासली. तृतीयपंथीयांना ओळखपत्र मिळवून देण्यात महाराष्ट्रात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 125 तृतीयपंथीयांना अशी ओळखपत्रं मिळवून देण्यात आली असल्याची माहिती खिरे यांनी दिली आहे. Transgender Identity Card च्या साह्याने त्यांना योजनांचा लाभ मिळू शकतो.

'तृतीयपंथीय समुदायातल्या आधार कार्ड (Aadhaar Card) नसलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचायचं आम्ही ठरवलं आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या व्यक्तींपर्यंत आम्ही स्वतः पोहोचत असून, हा संदेश त्यांच्यामार्फतही अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं जात आहे,' असंही खिरे म्हणाले.

OBC आरक्षण निवडणूक: भाजप सरकारच्या प्रयत्नांना यश, SC चा मोठा निर्णय

डिस्ट्रिक्ट ग्रिव्हान्स कौन्सिलकडे (District Grievance Council) अलीकडच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यातच तृतीयपंथीयांना आधार कार्ड देण्यासाठी विशेष शिबिर (Special Camp for Aadhaar Card for Transgenders) आयोजित करण्याचं निश्चित करण्यात आलं. हे शिबिर पुणे (Pune District) जिल्ह्यात वास्तव्याला असलेल्या तृतीयपंथीयांसाठी आहे. ट्रान्सजेंडर ग्रुपच्या लीडर्सनाही WhatsApp द्वारे याबद्दलचे मेसेजेस पाठवले जात आहेत.

आधार कार्डसाठी आवश्यक असलेली कागदपत्रं सर्व तृतीयपंथीयांकडे असतातच असं नाही. त्यामुळे त्यांना आधार कार्ड मिळण्यात अडचणी येतात. हे लक्षात घेऊन त्या अडचणी दूर करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रं (Essential Documents) नाहीत, त्यांना आमदार (MLA) किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहीचं ओळखपत्र लागतं. ते मिळवून देण्याची व्यवस्था या आधार कार्ड शिबिरात केली जाणार आहे, असंही खिरे यांनी नमूद केलं.

First published:
top videos

    Tags: Aadhar Card, Pune, Transgender