मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुणे: शंकेची पाल चुकचुकली अन् 2 महिन्यातच उद्धवस्त झाला संसार, पत्नीचा खून करून पंख्याला लटकवलं

पुणे: शंकेची पाल चुकचुकली अन् 2 महिन्यातच उद्धवस्त झाला संसार, पत्नीचा खून करून पंख्याला लटकवलं

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांनी (Police) हत्येप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांनी (Police) हत्येप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांनी (Police) हत्येप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पिंपरी-चिंचवड, 20 डिसेंबर: पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांनी (Police) हत्येप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीनं आधी पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर पत्नीनं आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तपासादरम्यान (During the Investigation) पोलिसांना पतीवर संशय आला. तसंच या प्रकरणाचा तपास करत असताना असे काही पुरावेही मिळाले की, हे प्रकरण आत्महत्येचे नसून खूनाचं असल्याचा पोलिसांना संशय आला.

आरोपी पतीचं नाव हेमंत असून मृत पत्नीचं नाव सपना आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी कराड जिल्ह्यातील रहिवासी असून तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. मेट्रोमोनियल साइटवर दोघांची भेट झाली. हळूहळू दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघांचंही कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हते. असे असूनही दोघांनी 28 ऑक्टोबर 2021 रोजी लग्न केलं.

हेही वाचा- भुवनेश्वर कुमारनं शेअर केला मुलीचा पहिला Photo, बाबांच्या कुशीत दिसली छोटी परी 

दरम्यान घरच्यांना या लग्नाची माहिती मिळताच चांगलाच गोंधळ उडाला. त्यानंतर सपना आणि हेमंत पिंपरी चिंचवडला राहायला गेले.

पतीनं केला पत्नीचा गळा दाबून खून

यादरम्यान हेमंतला भीती वाटू लागली की सपनाचे कुटुंब आपल्या पत्नीला परत घेऊन जातील. त्यामुळे दोघेही शहरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहू लागले. पण काही वेळानंतर हेमंतला वाटू लागले की सपना हे नाते तोडेल आणि आपल्या कुटुंबीयांकडे जाईल. यावरून दोघांमध्ये भांडणही व्हायचं. त्यातच रागाच्या भरात त्याने हॉटेलच्या खोलीत सपनाचा स्कार्फने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यानं खून करून मृतदेह पंख्याला लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव रचला.

हत्येनंतर मृतदेह पंख्याला लटकवला

पंख्याला लटकलेला मृतदेह पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठवला. तपासादरम्यान पोलिसांनी हॉटेलमध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यात पोलिसांना हेमंतवर संशय आला. ताब्यात घेतल्यानंतर हेमंतनं पोलिसांना चकवा देण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान हेमंतनं खूनाची कबूली दिली आणि आपला गुन्हा मान्य केला.

पोलिसांकडून आरोपीला अटक

मुलीच्या हत्येप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आता पुढील कारवाई सुरू आहे.

First published:

Tags: Pune