पुणे, 25 सप्टेंबर : पुण्यात पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. पीएफआयच्या आंदोलनाच्या आयोजकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बंडगार्डन पोलिसांनी आरोपींविरोधातली कलमं वाढवली आहेत. युवासेना, मनसे आणि भाजपने या आरोपींवर देशद्रोहाची कलमं लावण्याची मागणी केली होती, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सद्यस्थितीत देशद्रोहाचं कलम 124A कलम कोणत्याही गुन्ह्यात लागू करताच येत नाही, म्हणून पुणे पोलिसांनी संबंधित 124A हे कलम पुन्हा हटवलंय... बाकीची कलमं मात्र कायम राहणार आहेत.
पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातच याविषयीचे कलम ऍड करण्यात आलं आहे. कलम 153, 109, 120 ब ही आरोपींविरुद्ध नव्याने ऍड करण्यात आली आहेत.
यातलं कलम 153 सरकारी कामात अडथळा आणणे, कलम 109 चिथावणीखोर वक्तव्य करणे, कलम 120 ब कट तयार करणे, अशा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुरूवारी देशभरात एनआयएने पीएफआयच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. याविरोधात पीएफआयकडून आंदोलनं करण्यात आली, अशाचप्रकारचं आंदोलन पुण्यातही झालं. पुण्यातल्या याच आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे, याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
#WATCH | Maharashtra: ‘Pakistan Zindabad’ slogans were heard outside the District Collector's office yesterday in Pune City where PFI cadres gathered against the recent ED-CBI-Police raids against their outfit. Some cadres were detained by Police; they were arrested this morning. pic.twitter.com/XWEx2utZZm
— ANI (@ANI) September 24, 2022
पाकिस्तान जिंदाबादचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज पुण्यात मनसे, युवासेना आणि भाजपसह 12 हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं. कलेक्टर ऑफिससमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांची पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून फाडला. अलका चौकही मनसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी दणाणून सोडला. तिथं तर पाकिस्तानचा झेंडा एकदा नाहीतर दोनदा जाळला गेला.
LIVE | Media interaction in #Pune https://t.co/ZS0aPTSQok
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 25, 2022
भाजपने पुणे पोलीस आयुक्तालयातच पाकिस्तान मुर्दाबादची घोषणाबाजी केली आणि पोलीस आयुक्तांना पीएफआयवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं. यावेळी त्यांच्यासोबत संघ परिवारातल्या 12 संघटना उपस्थित होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.