Home /News /maharashtra /

Pune: मुलाला वाचवण्यासाठी आईने घेतली पाण्यात उडी, इंद्रायणी नदीत बुडून माय-लेकांचा मृत्यू

Pune: मुलाला वाचवण्यासाठी आईने घेतली पाण्यात उडी, इंद्रायणी नदीत बुडून माय-लेकांचा मृत्यू

मुलाला वाचवण्यासाठी आईची पाण्यात उडी, नदीत बुडून माय-लेकांचा मृत्यू, पुण्यातील हृदयद्रावक घटना

मुलाला वाचवण्यासाठी आईची पाण्यात उडी, नदीत बुडून माय-लेकांचा मृत्यू, पुण्यातील हृदयद्रावक घटना

Pune News: नदी पात्रात बुडत असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. मात्र, यामध्ये दोघांचाही दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

    गणेश दुडम, प्रतिनिधी पुणे, 5 जून : पुण्यातून (Pune) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नदी पात्रात बुडत असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी (mother jumps in river to save son) घेतली. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने माय-लेकरांचा बुडून मृत्यू (Mother and Son drowned) झाला आहे. मावळमधील कामशेत (Kamshet) येथील नायगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूनम शिंदे आणि युवराज शिंदे अशी मृतक माय-लेकरांची नावे आहेत. नेमकं काय घडलं? आई पूनम शिंदे आणि मुलगा युवराज शिंदे हे दोघेही इंद्रायणी नदी पात्रात गोधड्या धुण्यासाठी गेले होते. त्याचवेळी युवराज हा पाण्यात पडला. आपल्या मुलाला पाण्यात पडल्याचं पाहून आईनेही कसलाही विचार न करता त्याचे प्राण वाचवण्यासाठी लगेचच नदीत उडी घेतली. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आई आणि मुलगा हे दोघेही बुडू लागले. दोघेही पाण्यात बुडू लागल्याने जवळच पूनम शिंदेचा भाऊ होता. त्याने माय लेकराला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्याने दोन्ही माय-लेकरांना पाण्याबाहेर बेशुद्धावस्थेत काढले. त्यानंतर उपचारासाठी महावीर हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टर विखेश मुथा यांनी घोषित केले. या घटनेचा अधिक तपास कामशेत पोलीस करत आहेत. गोव्यातल्या प्रसिद्ध वकिलाचा भाचीसह बुडून मृत्यू गेल्या आठवड्यात सिंधुदुर्गात एक मामा-भाचीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नदीपात्रात बुडून मामा आणि भाची यांचा मृत्यू झाला आहे. नदीपात्रात चार बुडाल्याची घटना घडली. त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आलं. दोडामार्ग तालुक्यातील कुडासे-वानोशीवाडी येथील तिलारी नदीपात्राच्या दसई भागात चार जण बुडाल्याची घटना घडली. त्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आलं. या दुर्घटनेत मामा आणि भाची असा दोघांचा बुडून मृत्यू झाला. विजय पाळवेकर आणि तनिषा ठाकूर अशी मृत मामा- भाचीचं नाव आहे. विजय पाळवेकर हे गोव्याचे वकील आहे. कुडासे गावात त्यांच्या पाहुण्यांकडे आले असताना ही दुर्देवी घटना घडली.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra News, Pune

    पुढील बातम्या