मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune: महापालिकेच्या कारभारामुळे पुणे पाण्यात! मुसळधार पावसानंतर राजकीय वादळ तीव्र VIDEO

Pune: महापालिकेच्या कारभारामुळे पुणे पाण्यात! मुसळधार पावसानंतर राजकीय वादळ तीव्र VIDEO

Pune Flood : पुण्यात रविवारी (11 सप्टेंबर) रोजी झालेल्या पावसामूळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. चार तासांच्या पाण्यामुळे शहर ठप्प झाले. या पावसानंतर आता राजकीय वादळ तीव्र झाले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 13 सप्टेंबर :  पुण्यात रविवारी (11 सप्टेंबर) रोजी झालेल्या पावसामूळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. चार तासांच्या पाण्यामुळे शहर ठप्प झाले. मुसळधार पाऊस आणि त्या पावसानंतर शहराची होणारी बिकट अवस्था (Flood in Pune) हे चित्र पुणेकरांना गेल्या काही वर्षांपासून दर पावसाळ्यात पाहायला मिळत आहे. रविवारच्या मुसळधार पावसानंतर शहरात राजकीय वादळानं वेग घेतलाय.

पुणे महापालिकेत विरोधी बाकांवर असलेल्या शिवसेनेनं पुण्याच्या परिस्थितीची खापर महापालिकेच्या कारभारावर फोडलं आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केलीय. ‘महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारामध्ये पुणेकरांची काळजी केली नाही. पालिकेच्या गैरकारभारामुळे पुणेकरांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील ओढे, नदी आणि नाल्यांवर अनधिकृत बांधकामं करण्यात आली आहेत. काही नद्यांचे प्रवाह देखील बदलले आहेत. या सर्व प्रकाराला भाजपा जबाबादार आहे,’ असा आरोप गोऱ्हे यांनी केला आहे.

भाजपानं फेटाळले आरोप

भारतीय जनता पक्षाचे आमदार जगदीश मुळीक यांनी विरोधकांचा आरोप फेटाळत शहराचे माजी पालकमंत्री अजित पवारांकडे बोट दाखवलंय. ‘आम्ही अनेकदा नालेसफाईबाबत प्रशासनाला विनंती केली होती. मात्र, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीला अपयशी दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेली ही खेळी आहे. या सर्व परिस्थितीला ते जबाबदार आहेत.

अबब! पाऊस अजून एवढे दिवस थांबणार, मुंबईकरांनो सावधान तुंबई होणार

तत्कालीन पालकमंत्र्यांनी कडक निर्देश दिले असते तर ही परिस्थिती पुण्यावर आली नसती. भाजपाची पुण्यावर फक्त पाच वर्षे सत्ता आहे. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पन्नास वर्ष होती. त्यांनी पुणेकरांच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम आज पुणेकर भोगत आहेत, असं प्रतिउत्तर मुळीक यांनी दिलं आहे.

First published:

Tags: Pune, Pune rain, Rain flood