मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : पुण्यातील नवले पुलावर अपघातात तब्बल 48 वाहनांचे नुकसान; कारण आले समोर

Video : पुण्यातील नवले पुलावर अपघातात तब्बल 48 वाहनांचे नुकसान; कारण आले समोर

पुण्यातील नवले पुलावर अपघातात तब्बल 48 वाहनांचे नुकसान

पुण्यातील नवले पुलावर अपघातात तब्बल 48 वाहनांचे नुकसान

पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत एकुण 48 वाहने समाविष्ट असल्याचे समजले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पुणे, 20 नोव्हेंबर : पुण्यातील नवले ब्रिजवर आज झालेल्या एका अपघताने पुणेकरांच्या हृदयाची धडधड काही क्षणासाठी थांबली असेल. एकदा भरधाव टँकर एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे नवले ब्रिजवरील वाहतून विस्कळीत झाली आहे. टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने नवले ब्रिजवर एकामागून एक वाहनांना जोरदार धडक बसली. यात अनेकजण जखमी झाल्याचे पोलिसांनी आणि अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे.

काय आहे घटना?

पुणे शहरातील कायम व्यस्त असलेल्या नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत एकुण 48 वाहने समाविष्ट असल्याचे समजले असून तसेच पीएमआरडीए, अग्निशमन दल बचावकार्य करत आहे. किमान 10 जखमींवर शासकीय रुग्णवाहिका 108 मधे उपचार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गर्दीच्याच वेळी नवले पुलावर ब्रेक निकामी झाल्याने भरधाव आलेल्या टँकरने अनेक वाहनांना धडक देत वाहनांचे प्रचंड नुकसान केले आहे.

या घटनेची माहिती समजताचा घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी करण्यात आली. यावेळी अपघातात जखमींना नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पुढील तपास चालू केला आहे.

वाचा - पुण्यात मोठी दुर्घटना, नवले ब्रिजवर तब्बल 30 गाड्या एकमेकांना धडकल्या, धक्कादायक PHOTOS!

नवले पुल झालाय अपघाताचा सापळा

नवले पुलावर झालेला हा काही पहिला अपघात नाही. यापूर्वीही अनेकदा असे अपघात घडले आहे. अपघात झाल्यानंतर प्रशासनाकडे यावर तोडगा काढण्याची मागणी करुनही यावर अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे या पुलावर वारंवार अपघात होत आहेत. आता तरी प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न या निमित्ताने पुणेकर विचारू लागले आहे.

First published:

Tags: Accident, Pune