मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात आता आंदोलनही 'चुलीवरचं', राष्ट्रवादीच्या महिलांनी रस्त्यावर बनवला फराळ

पुण्यात आता आंदोलनही 'चुलीवरचं', राष्ट्रवादीच्या महिलांनी रस्त्यावर बनवला फराळ

मागच्या काही वर्षांमध्ये पुण्यात चुलीवरच्या पदार्थांची क्रेझ मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. चुलीवरची मिसळ, चुलीवरचं मटण आणि चुलीवरच्या पिझ्झा यानंतर आता पुण्यात चुलीवरचा फराळ बनवण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Shreyas

पुणे, 3 ऑक्टोबर : मागच्या काही वर्षांमध्ये पुण्यात चुलीवरच्या पदार्थांची क्रेझ मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. चुलीवरची मिसळ, चुलीवरचं मटण आणि चुलीवरच्या पिझ्झा यानंतर आता पुण्यात चुलीवरचा फराळ बनवण्यात आला आहे. चुलीवरचा हा फराळ वाढती मागणी अथवा मार्केटिंगमुळे नाही तर आंदोलनासाठी बनवण्यात आला. केंद्र सरकारच्या 15 एलपीजी सिलेंडर देण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या टिळक रोडवरच्या अभिनव चौकात आंदोलन करण्यात आलं.

1053 रुपये देऊनही वर्षाला 15 सिलेंडरच का? हेच आहेत का अच्छे दिन? अशी पोस्टर घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी चुलीवर करंजी आणि चकली हे पदार्थ बनवले.

केंद्र सरकारने सर्वसामन्यांना वर्षाला 15 सिलेंडर मर्यादित केले आहेत. यापुढच्या प्रत्येक सिलेंडरला जास्तचे पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने हे चुलीवरचं आंदोलन केलं.

गेल्या 8 वर्षांपासून महागाई सातत्याने वाढत आहे, 400 रुपयांचा सिलेंडर 1100 रुपयांपर्यंत गेला आहे, त्यातही आता एका कुटुंबाला फक्त 15 सिलेंडर मिळणार आहेत. या नियमाचा सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे. केंद्र सरकारने त्वरित ही वाढलेली महागाई कमी करावी आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.

First published:

Tags: NCP, Pune