मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुणे पुन्हा हादरलं; 48 वाहनांच्या अपघातानंतर नवले पुलावर पुन्हा ट्रकची धडक

पुणे पुन्हा हादरलं; 48 वाहनांच्या अपघातानंतर नवले पुलावर पुन्हा ट्रकची धडक

पुण्यातील नवले ब्रिजवर रविवारी झालेल्या एका अपघाताने पुणेकरांच्या हृदयाची धडधड काही क्षणासाठी थांबली होती. आता पुन्हा एकदा पुणेकरांसाठी धक्कादायक बातमी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Meenal Gangurde

पुणे, 22 नोव्हेंबर : पुण्यातील नवले पुलावर 48 वाहनांच्या अपघातानंतर खळबळ उडाली होती. त्या घटनेला काही तास उलटले नाही तो पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मधील असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेत 2 चार चाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. हा ट्रक कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातनंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे.

पुण्यातील नवले ब्रिजवर रविवाीरी झालेल्या एका अपघाताने पुणेकरांच्या हृदयाची धडधड काही क्षणासाठी थांबली. एकदा भरधाव टँकर एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे नवले ब्रिजवरील वाहतून विस्कळीत झाली आहे.

टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने नवले ब्रिजवर एकामागून एक वाहनांना जोरदार धडक बसली. यात अनेकजण जखमी झाल्याचे पोलिसांनी आणि अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे.

काय आहे घटना?

पुणे शहरातील कायम व्यस्त असलेल्या नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत एकूण 48 वाहने समाविष्ट असल्याचे समजले असून तसेच पीएमआरडीए, अग्निशमन दल बचावकार्य करत आहे. किमान 10 जखमींवर शासकीय रुग्णवाहिका 108 मध्ये उपचार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गर्दीच्याच वेळी नवले पुलावर ब्रेक निकामी झाल्याने भरधाव आलेल्या टँकरने अनेक वाहनांना धडक देत वाहनांचे प्रचंड नुकसान केले आहे.

First published:

Tags: Accident, Pune