मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pimpri Chinchwad: लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळला जोडप्याचा मृतदेह, दिघी परिसरातील घटनेने खळबळ

Pimpri Chinchwad: लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळला जोडप्याचा मृतदेह, दिघी परिसरातील घटनेने खळबळ

एका लॉजमध्ये जोडप्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरातील ही घटना आहे.

एका लॉजमध्ये जोडप्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरातील ही घटना आहे.

एका लॉजमध्ये जोडप्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरातील ही घटना आहे.

पुणे, 25 नोव्हेंबर : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील एका लॉजमध्ये जोडप्याचा मृतदेह आढळून आला आहे. दोघांचेही मृतदेह नग्नावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील दिघी येथील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Couple naked dead body found in lodge Pimpri Chinchwad Pune)

जोडप्याचा नग्नावस्थेत मृतदेह

पिंपरी चिंचवड परिसरातील दिघी येथे असलेल्या अथर्व लॉजमध्ये जोडप्याचा मृतदेह आढळून आला आहे. हे जोडपं कोण आहे? त्यांची नावे काय आहेत तसेच कुठले निवासी आहेत याबाबतची अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. पण दोघांचेही मृतदेह नग्नावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांचा प्राथमिक अंदाज

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्येचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असला तरी याप्रकऱणी पोलीस विविध अँगलने आपला तपास करत आहेत.

वाचा : भाजप आमदार जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला, पिंपरीत खळबळ LIVEO VIDEO

अंघोळ करणाऱ्या महिलेसोबत सुरक्षा रक्षकाचं अश्लील कृत्य

पुणे स्टेशन परिसरात असलेल्या इन्स्पेक्शन बंगलोच्या शासकीय निवासस्थानात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका सुरक्षा रक्षकानं गेस्ट हाऊसमध्ये अंघोळ करणाऱ्या महिलेसोबत अश्लील कृत्य केलं आहे. आरोपीनं संबंधित महिलेचा अंघोळ करताचा अश्लील व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित संतापजनक प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने महिलेनं मदतीसाठी आरडाओरड केली. यावेळी आसपास असणाऱ्या लोकांनी आरोपीला सुरक्षा रक्षकाला पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केलं आहे.

याप्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपी सुरक्षा रक्षकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय पीडित महिला पुणे स्टेशन परिसरात असलेल्या आयबीच्या गेस्ट हाऊसमधील एका रुममध्ये थांबल्या होत्या.

वाचा : किरकोळ वादातून नवऱ्याचं राक्षसी कृत्य; डोक्यात दगडी पाटा घालून पत्नीला दिला भयंकर मृत्यू

भर दिवसा जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा

जुन्नरच्या अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत 24 नोव्हेंबर रोजी सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. दरोड्यांनी केलेल्या गोळीबारात पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे. आरोपी एवढं मोठं धाडसं करुच कसं शकतात? त्यांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असे अनेक प्रश्न आता स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

जुन्नरच्या 14 नंबर येथील अनंत पतसंस्था ही पुणे-नाशिक महामार्ग लगत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर आणि लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात हेल्मेट घातलेल्या व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश केला. त्यांनी व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशाची मागणी करत गोळीबार केला. यामध्ये राजेंद्र भोर (वय 52) प्रचंड जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नारायणगाव याठिकाणी नेले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

First published:

Tags: Crime, Pimpri chinchawad, Pune