Home /News /maharashtra /

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता एकदिवसाआड होणार पाणीपुरवठा, 4 जुलैपासून अंमलबजावणी सुरू

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता एकदिवसाआड होणार पाणीपुरवठा, 4 जुलैपासून अंमलबजावणी सुरू

पुण्यातल्या धरण साखळीत पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे, शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता होती.

     पुणे 28 जून : मुंबई महानगरपालिकेकडून पाणी कपातीचा (Water cut by BMC) निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर लगेचच ठाणे महानगरपालिकेसुद्धा (TMC) याच संदर्भातील निर्णय घेण्यात आला. मात्र, यापाठोपाठ आता पुणेकरांसाठीही (PMC) वाईट बातमी आहे. पुणेकरांनाही आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. (Water Cut in Pune). पुणे मनपा प्रशासनाने घेतला हा निर्णय - पुण्यातल्या धरण साखळीत पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे, शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता होती. त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून आता पुण्यात सोमवार, 4 जुलैपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. पुणे शहरात आणि परिसरात पावसाची कमतरता आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. म्हणून पुढील आठवड्यात 4 जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल आणि त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.  हेही वाचा - Pune : ग्राहकांनो सावधान! ओरिजनल सिल्क कसे ओळखाल? फसवणूक केलीच तर विक्रेत्यास 'इतक्या' वर्षांची होते शिक्षा पाणी टंचाई होण्याची शक्यता -  महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आज शुक्रवारी पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. एकूण पाणी वापरात साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत पाणीकपात केली जाणार आहे. सध्यस्थितीत, रोजचा पाण्याचा वापर 1650 दशलक्ष लिटर इतका आहे. त्यात 30 टक्क्यांपर्यंत कपात केली तर रोज सरासरी 1200 दशलक्ष लिटर पाणी वापर करावा लागणार आहे. त्यामुळे 450 दशलक्ष लिटर पाणी कमी घेण्यात येणार असल्याने काही भागात पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे. मुंबईतही करण्यात आलीये पाणीकपात - मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस प़डला आहे. त्यामुळे सध्यच्या परिस्थितीत तलावांमध्ये अत्ंयत कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला. ही 10 टक्के पाणी कपात मुंबई महानगरपालिकेतर्फे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यालाही लागू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Water crisis

    पुढील बातम्या