मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आलिशान सोसायटींना जास्त प्रॉपर्टी टॅक्स? 'इनकम' वाढवण्याचा पुणे महापालिकेचा फंडा, नागरिकांचा विरोध

आलिशान सोसायटींना जास्त प्रॉपर्टी टॅक्स? 'इनकम' वाढवण्याचा पुणे महापालिकेचा फंडा, नागरिकांचा विरोध

पुण्यातला असमान मिळकतकराचा प्रश्न सोडवण्यासाठी आता पुणे मनपा (Pune Property Tax) रेडीरेकनर ऐवजी कॅपिटल व्हॅल्यू असेसमेंट अर्थात घराची किंमत सोईसुविधा यावरून मिळकतकर ठरवण्याची तयारी करतेय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 6 सप्टेंबर : पुण्यातला असमान मिळकतकराचा प्रश्न सोडवण्यासाठी आता पुणे मनपा (Pune Property Tax) रेडीरेकनर ऐवजी कॅपिटल व्हॅल्यू असेसमेंट अर्थात घराची किंमत सोईसुविधा यावरून मिळकतकर ठरवण्याची तयारी करतेय, मात्र यामुळे आलिशान सोसायट्यांमधील सदनिकांना जास्त मिळकतकर द्यावा लागणार आहे. महापालिकेच्या मिळकतकर वाढवून उत्पन्न वाढवण्याच्या या प्रस्तावाला मात्र विरोध होताना दिसतोय.

पुणे महापालिकेने (Pune Mahanagar Palika) प्रायोगिक तत्वावर एका क्षेत्रीय कार्यालयाच्या मर्यादेत कॅपिटल असेसमेंट प्रॅाप्रटी टॅक्सची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे आलिशान सोसायट्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या स्विमिंग पूल , जीम, क्लबहाउस सारख्या सुविधा आणि सदनिकांची किंमत यावरून मिळकतकर ठरवण्याचा हा प्रस्ताव आहे, मात्र यामुळे नागरिकांमध्ये गरीब श्रीमंत अशी वर्गवारी केली जाईल जी शासकीय संस्था म्हणून मनपाने करणे अयोग्य ठरेल, असा सूर सर्वपक्षीय टीकेतून दिसतोय. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आणि आपचे नेते विजय कुंभार यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे.

मोठ्या सोसयटीच्या सदनिकाधारकांच्या मते सोसायटीमध्ये मिळणाऱ्या सुविधा या सदनिकाधारक आधीच जास्त पैसे देऊन घेतात त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च ही करतात, त्यात महापालिकेचा कुठलाही संबंध नसतो तर त्यावर महापालिका कर आकारणी कशी करू शकेल? याउलट मोठ्या आलिशान गृहप्रकल्पांच्या वेळीच ॲमेनिटी स्पेससाठी महापालिकेला जागा ही दिल्या जातात त्यामुळे पुन्हा जास्त सुविधेच्या नावाखाली मिळकतकर वाढवण अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांनी दिली आहे.

महापालिकेच्या कॅपिटल असेसमेंट टॅक्सच्या संकल्पनेला प्रायोगिक तत्वावरही राबवण्याला मोठा विरोध होतोय, त्यामुळे मिळकतकर वाढवून महापालिकेच उत्पन्न वाढीच उद्दिष्ट पूर्ण होण अवघड दिसतंय.

First published:

Tags: Pune