मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune Moped Thief : रविवारी ठरलेल्या वेळेत पांढरी गाडी चोरायचा, कारण ऐकून पोलीसही चक्रावले

Pune Moped Thief : रविवारी ठरलेल्या वेळेत पांढरी गाडी चोरायचा, कारण ऐकून पोलीसही चक्रावले

पुणे तिथे काय उणे ही म्हण अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या म्हणीला साजेसं एका पुण्यातील व्यक्तीने काम केले आहे. पुण्यात राहणाऱ्या चोरट्याने चोरी करण्याच्या पद्धतीने चक्क कहरच केला आहे.

  पुणे, 17 ऑगस्ट : पुणे तिथे काय उणे ही म्हण अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.  या म्हणीला साजेसं एका पुण्यातील व्यक्तीने काम केले आहे. पुण्यात राहणाऱ्या चोरट्याने चोरी करण्याच्या पद्धतीने चक्क कहरच केला आहे. (Pune Moped Thief) तो चोर चक्क पांढऱ्या रंगाच्याच मोपेड वाहनं चोरी करायचा. दरम्यान या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा शौक ऐकून पोलिसांनाही आश्चर्य वाटले आहे. यातील विशेष बाब म्हणजे तो रविवारी फक्त 11 ते 1 यावेळेतच मोपेड चोरी करायचा.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने 7 पांढऱ्या मोपेड वाहने चोरी केली आहेत. पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. विवेक वाल्मीक गायकवाड (वय 20, रा. थेरगांव) असे अटक केलेल्या तरूण चोरट्याचे नाव आहे. पोलिसानी अटक केल्यानंतर त्याच्याकडून 7 पांढऱ्या मोपेड दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

  हे ही वाचा : पुणे हादरलं! भरदिवसा व्यावसायिक चाकूने वार करत हत्या, कारण अस्पष्ट

  विवेक हा मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. तो काही दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. त्याच्या हाताला कोणतेही काम नव्हते. फक्त नव्या गाड्या घेऊन फिरण्याचा नाद होता. त्याही नवीन पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाड्या. म्हणून तो पार्किंग मधून नवीन गाड्या चोरायचा, मात्र विकत नव्हता. तो गाड्या फिरवायचा आणि त्या गाडीतील पेट्रोल संपल्यानंतर गाडी त्याच ठिकाणी सोडून पसार होत असायचा. त्याने चतु:श्रृंगी, वाकड, सांगवी या भागातून या दुचाकी चोरी केल्या होत्या.

  शहरात वाहन चोरट्याने धुमाकूळ घातला आहे. म्हणून परिमंडळ चार विभागचे उपयुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाड, तेजस चोपडे, बाबा दांगडे व त्यांच्या पथकाने चोराचा शोध घेतला. पोलिसानी चोराची पुढची क्लुप्ती शोधत विविध भागात थेट पार्किंगमध्ये ट्रॅप लावला.

  हे ही वाचा : मॅट्रिमोनिअल साईटवरील ओळख पडली महागात, पुण्यात लग्नाचे आमिष देऊन घटस्फोटित महिलेवर बलात्कार

  त्यानुसार, एका सोसायटीत पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मुळे व किशोर दुशिंग यांनी एका पार्किंगमध्ये थांबलेले असतानाच विवेक हा नव्या गाड्यांना चाव्या लावून पाहत असल्याचे दिसले. तत्काळ पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी, त्याने 7 गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याने डी-मार्टच्या पार्किंगमधूनही दुचाकी चोरल्याची माहिती दिली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune crime, Pune crime news

  पुढील बातम्या