मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : पुण्यात रात्री जोरदार राडा, सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, पोलिसांचा हवेत गोळीबार

Pune : पुण्यात रात्री जोरदार राडा, सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, पोलिसांचा हवेत गोळीबार

Mob attacked on Police team in Pune: सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीमवर जमावाकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mob attacked on Police team in Pune: सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीमवर जमावाकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mob attacked on Police team in Pune: सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीमवर जमावाकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे, 31 डिसेंबर : पुण्यात एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीमवर जमावाने हल्ला (mob attacked on Pune Police team) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील येरवडा (Yerwada, Pune) परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भातील व्हिडीओ सुद्धा जोरदार व्हायरल होत आहेत.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या कोतेवस्ती येथे गुरुवारी रात्री हा प्रकार घडला आहे. या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांना शक्‍ती सिंह नावाचा सराईत गुन्हेगार आणि त्याचे साथीदार त्रास देत होते. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर येरवडा पोलिसांची एक टीम गुरुवारी रात्री शक्‍ती सिंह यास पकडण्यासाठी गेली. यावेळी जमावाने पोलिसांच्या टीमवर हल्ला केला.

पोलीस कर्मचारी जखमी

पोलीस कारवाई करत असताना सराईत गुन्हेगार शक्ती सिंह याने समाजातील नागरिकांना पोलिसांविरुद्ध भडकवले. शक्ती सिंह याचे ऐकून समाजातील नागरिकांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह इतरही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले. जखमींना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा : पिंपरीत पुन्हा गोळीबार, 11वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या

पोलिसांचा हवेत गोळीबार

जमावाने हल्ला केल्यावर पोलिसांनी स्व: संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. पोलिसांनी हवेत केलेला गोळीबार तसेच जमावाकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी झालेल्या गोंधळाचे व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत. या व्हिडीओत पोलीस हवेत गोळीबर करत असल्याचंही दिसून येत आहे.

पिंपरीत गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये चकमक

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड परिसरात दिवसाढवळ्या योगेश जगताप नावाच्या एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरही आरोपींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना चार दिवसांपूर्वी समोर आली. चाकण परिसरात गुन्हेगार आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक घडली. स्व संरक्षणासाठी पोलिसांनी देखील आरोपींवर गोळीबार केला.

गोळीबाराच्या थरारनंतर पोलिसांनी गणेश माटेसह महेश माने आणि अश्विन चव्हाण या तिघांना जेरबंद केलं आहे. संबंधित तिघेही योगेश जगताप यांची हत्या करून फरार झाले होते. अखेर त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

First published:

Tags: Crime, Pune, Shocking viral video