पुणे, 14 जानेवारी : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता पुणे जिल्ह्यातून (Pune district) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील (Indapur Taluka) एका गावात अल्पवयीन मुलीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आत्महत्येपूर्वी या मुलीने एक चिठ्ठी लिहिली होती (suicide note) आणि त्यातील माहिती समोर येताच सर्वांना एक मोठा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पीडित मुलगी ही इयत्ता नववीत शिकत होती. बुधवारी तिने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून टेवली होती. त्यात चिठ्ठीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पीडित मुलीने एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिठ्ठीत तिने म्हटलं, वडिलांच्या प्रतिमेस धक्का लागू नये म्हणून मी आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. ही चिठ्ठी पोलिसांना आणि नागरिकांना मिळाली. गावातील तीन मुले या मुलीची छेडछाड करत होती अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तिघा मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छेडछाडीला कंटाळून या मुलीने आपल्या आयुष्याचा शेवट केला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
निर्भयाची पुनरावृत्ती; मूकबधीर अल्पवयीन मुलीवर गँगरेप
राजस्थानच्या अल्वर येथे मूकबधीर अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील सत्य समोर आल्यानंतर सगळेच थक्क झाले आहेत. जयपूरमध्ये आठ डॉक्टरांच्या टीमने पीडितेचं मोठं ऑपरेशन केलं आहे. पीडितेची अवस्था सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. दिल्लीतील निर्भया घटनेचीच राजस्थानमध्ये पुनरावृत्ती झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आरोपींच्या अटकेसाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत.
अल्वरमधील सामूहिक बलात्कारानंतर रस्त्यावर फेकलेल्या अल्पवयीन मुलीला बुधवारीच अलवरहून जयपूरला घेऊन जाण्यातं आलं. जयपूरच्या जेके लोन हॉस्पिटलमध्ये 8 डॉक्टरांच्या टीमने पीडितेवर मोठं ऑपरेशन केलं. ऑपरेशननंतर पीडितेची प्रकृती स्थिर आहे. तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.