मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

स्वातंत्र्यदिनी पुणेकरांचा खास विक्रम! प्रवासी संख्येने मोडला रेकॉर्ड, आता नवीन मार्ग सुरू

स्वातंत्र्यदिनी पुणेकरांचा खास विक्रम! प्रवासी संख्येने मोडला रेकॉर्ड, आता नवीन मार्ग सुरू

पुणे मेट्रो.

पुणे मेट्रो.

पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन अशी पहिली ट्रायल रन घेतली आहे.

    पुणे, 15 ऑगस्ट : देशभरात 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना पुण्यातही एक विशेष घटना घडली आहे. पुणे मेट्रोने दैनंदिन प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला आहेय 15 ऑगस्ट 2022 रोजी 70,000 पेक्षा जास्त प्रवासी संख्या (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) पार केली. त्यामुळे मेट्रोला पुणेकरांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे मेट्रोचे वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक आणि पिंपरी चिंचवड महानगपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक हे विभाग 6 मार्च 2022 रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर कार्यान्वित करण्यात आले होते. आता देशाच्या अमृतमहोत्सवी आणखी काही मार्ग खुले करण्यात येणार आहे. आझादीचा अमृत महोस्तव आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने, पुणे मेट्रोने रिच 1 वरील फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन आणि रिच 2 वरील गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो अशी पहिली चाचणी पूर्ण करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. या चाचणीला मोठे यश मिळाले आणि त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे सिव्हिल कोर्ट स्थानक आणि फुगेवाडी स्थानक येथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या कार्यरत असलेल्या गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत आणि परतीच्या प्रवासाला सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानकातून ते दापोडी मेट्रो स्थानकाकडे मेट्रो त्याच वेळेस धावली. दोन्ही गाड्यांचा ट्रायल रनचा वेग 15 किमी प्रती तास इतका होता आणि तो नियोजनाप्रमाणे प्रमाणे पूर्ण झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जनता Traffic मध्ये 'कैद'; पुणे ते मुंबई प्रवास 8 तासांचा यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, “आम्ही येत्या काही महिन्यांत मेट्रोचे उर्वरित मार्ग उघडण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि रिच 1 मध्ये फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशनपर्यंत आणि रिच 2 मध्ये गरवारे मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रोपर्यंत पहिली ट्रेन ट्रायल चालवली जाईल. त्यासाठी सुरुवात आजपासून झाली आहे” पुणे मेट्रोला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे मेट्रोला आज मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा पुणे मेट्रोच्या शिरेपेचात आजुन एक मानाचा तुरा आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने अनेक पुणेकरांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले. पुणे मेट्रोच्या प्रवाशांनी मागील दिवसाचा विक्रम आज मोडला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 70 हजारांहून अधिक लोकांनी मेट्रोने प्रवास केला आहे. मागील दैनंदिन प्रवासी रेकॉर्ड प्रति दिन 67,280 प्रवासी होते. मोठ्या संख्येने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, कौटुंबिक गट, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवासी यांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या या 15 ऑगस्टच्या दिवशी रायडरशिप प्रतिदिन 75,000 प्रवासी पार करेल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Pune metro

    पुढील बातम्या