मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Raksha Bandhan : भद्राकाळ टाळण्यासाठी 'या' मुहूर्तावर बांधा राखी, VIDEO

Raksha Bandhan : भद्राकाळ टाळण्यासाठी 'या' मुहूर्तावर बांधा राखी, VIDEO

रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याच्या नक्की कोणता योग्य मुहूर्त आहे? ज्या मुहूर्तावरती बहिणीने आपल्या भावाला राखी ( Rakhi ) बांधावी याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.

  पुणे, 10 ऑगस्ट : सध्या कोरोनाच्या ( Corona) दोन वर्षाच्या कालखंडानंतर सर्वत्र रक्षाबंधनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासाठी बाजारपेठा देखील मोठ्या प्रमाणावर सजल्या आहेत. बाजारात रंगेबिरंगी राख्या देखील आता आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत. येत्या 11 तारखेला संपूर्ण देशभरात रक्षाबंधन ( Raksha Bandhan )  साजरे केले जाईल. या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तसंच रक्षाबंधनच्या शुभेच्छा ही आवर्जून दिल्या जातात. रक्षाबंधनाच्या  दिवशी राखी बांधण्याचा नक्की कोणता योग्य मुहूर्त आहे? कोणत्या मुहूर्तावर बहिणीनं  भावाला राखी ( Rakhi ) बांधावी याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा आणि विशिष्टीकरण योग  याबाबत ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी सांगितले की,  रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा आणि विशिष्टीकरण योग आहेत. या योगामध्ये एका विशिष्ट वेळीच आपण रक्षाबंधन साजरे करावे. 11 ऑगस्ट सकाळी 8 वाजता पोर्णिमा सुरू होत आहे. रक्षाबंधनाला भद्रा योग आणि विशिष्टीकरण योग असणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. विशिष्टीकरण हा एक अशुभ योग मानला जातो. मात्र या योगाच्या मध्यानात आपण रक्षाबंधन साजरी करू शकता.

  हेही वाचा : Pune: यंदा राखी बांधा आणि नंतर खा! भावासाठी घेऊन या Chocolate Rakhi, Video

  दुपारी 12 वाजून 50 मिनिटे ते दुपारी 2 वाजून 50 मिनिटापर्यंत आपण रक्षाबंधन करू शकता. यानंतर 3 ते 9 वाजेपर्यंत चा वेळ निषिद्ध मानला आहे. ज्यांना अतिशय शुभ योगावरच रक्षाबंधन साजरी करायचे आहे. त्यांनी रात्री 9 नंतर विशिष्टीकरण संपल्यानंतर रक्षाबंधन साजरी केली तरीही चालेल, असे देखील ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी सांगितले. कसे साजरे करावे रक्षाबंधन? रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावांना राखी बांधतात. यावेळी भावाच्या कपाळी कुमकुम लावून भावाच्या कपाळी अक्षदा लावून काही अक्षदा डोक्यावर टाकाव्यात. तसेच सोन्याचे किंवा एखादी नाणी घेऊन भावाला ओवाळावे व भावाच्या उजव्या मनगटावर शुभ चिन्हांकृत असलेली राखी बांधावी. राखी बांधून झाली की भावाला निरांजनाने तीन वेळा ओवाळावे. तसेच भावाला एखादा गोड पदार्थ खाऊ घालावा.
  First published:

  Tags: Pune

  पुढील बातम्या