मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Coronavirus: परदेशातून पुण्यात आलेल्या व्यक्तीच्या कोविड रिपोर्टमध्ये आढळला हा Corona variant

Coronavirus: परदेशातून पुण्यात आलेल्या व्यक्तीच्या कोविड रिपोर्टमध्ये आढळला हा Corona variant

coronavirus news updates: डोंबिवलीतील तरुणाचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील तो पहिला ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहे.

coronavirus news updates: डोंबिवलीतील तरुणाचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील तो पहिला ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहे.

coronavirus news updates: डोंबिवलीतील तरुणाचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील तो पहिला ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहे.

पुणे, 5 डिसेंबर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant of Coronavirus) भारतात शिरकाव केल्याने चिंता वाढली. कर्नाटक (Karnataka) नंतर गुजरात (Gujarat)मध्येही ओमायक्रॉन व्हेरिएंटबाधित रुग्ण आढळून आले. परदेशातून महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोविड बाधितांचे नमुने जुनकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या जनुकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी एका बाधिताला ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे.

पुण्यातील बाधिताला कोरोनाच्या 'या' व्हेरिएंटची लागण

झांबिया देशातून पुण्यात आलेल्या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याचा जनुकीय तपासणीचा अहवाल आता प्राप्त झाला आहे. त्या तपासणीत तो रुग्ण ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तो ओमायक्रॉन निगेटिव्ह असून, त्याला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे दिसून आले आहे. दक्षिण आफ्रिकेजवळील झांबिया देशातून 20 दिवसांपूर्वी हा व्यक्ती पुण्यात आला होता. (Pune man infected with delta variant of Coronavirus not Omicron variant)

वाचा : ओमायक्रॉन महाराष्ट्रात धडकला, डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण

झांबियामधून पुण्यात आलेल्या या प्रवाशाला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला होता व त्याला हलका तापही आला होता. त्यामुळे त्याची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली तेव्हा तो कोरोनाबाधित आढळून आला. खबरदारीचा उपाय म्हणून त्याची 30 नोव्हेंबरला ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ म्हणजे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचं ठरले, त्यासाठी त्याचा स्वॅब राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आला. त्यात तो ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

डोंबिवलीतील ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे 24 नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.

वाचा : कोरोनाची लस न घेता दक्षिण आफ्रिका, दुबई व्हाया डोंबिवली, omicron positive रुग्णाची धक्कादायक माहिती

हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.

या रुग्णाच्या 12 अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि 23 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

First published:

Tags: Coronavirus, Dombivali, Pune