पुणे, 7 डिसेंबर : दोन दिवसांत पुण्यात हत्येच्या घटना (Pune murder) घडल्या आहेत. भरदिवसा एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी हत्येची घटना घडली आहे. किरकोळ कारणावरुन पती आणि पत्नी यांच्यात झालेला वाद विकोपाला गेला. या वादानंतर संतापलेल्या पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Pune woman beaten to death by husband over minor dispute)
काय घडलं नेमकं?
मुलं भांडण करतात आणि त्रास देतात या कारणावरुन पती आणि पत्नीत वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोघांत कडाक्याचे भांडण झाले. यानंतर संतापलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. मृतक महिलेचं नाव आसमा तौसिफ हवारी असे आहे.
वाचा : बकरीसाठी दोघांची निर्घृण हत्या
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भवानी पेठ परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपी असलेला पती हौसिफ हवारी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
वाचा : Pune robbery cctv : बंदुकीचा धाक दाखवून दरोडा
सलग दुसऱ्या दिवशी हत्या
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी हत्या झाली आहे. सोमवारी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून अचानक आलेल्या मारेकऱ्यांनी व्यावसायिकावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे संबंधित तरुण घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या घटनेत संबंधित व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तापस केला आहे.
समीर मनूर शेख (Samir sheikh murder) असं हत्या झालेल्य तरुणाचं नाव आहे. हा हल्ला सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर झाला आहे. प्रचंड वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर चंद्रभागा चौकात मारेकऱ्यांनी तब्बल 6 गोळ्या घालून त्यांचा खून केला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित हत्या आर्थिक कारणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune