मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /थंडीत दारुची प्रचंड विक्री वाढली, पुण्यातले आकडे बघा काय सांगताय

थंडीत दारुची प्रचंड विक्री वाढली, पुण्यातले आकडे बघा काय सांगताय

पुणे (Pune) जिल्ह्यात थंडीच्या दिवसांमध्ये दारुच्या (Liquor) विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये देशी, विदेशी दारुचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे बिअर विक्रीत सर्वाधिक वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे.

पुणे (Pune) जिल्ह्यात थंडीच्या दिवसांमध्ये दारुच्या (Liquor) विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये देशी, विदेशी दारुचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे बिअर विक्रीत सर्वाधिक वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे.

पुणे (Pune) जिल्ह्यात थंडीच्या दिवसांमध्ये दारुच्या (Liquor) विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये देशी, विदेशी दारुचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे बिअर विक्रीत सर्वाधिक वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे.

पुणे, 9 डिसेंबर : राज्यावर सध्या कोरोनाचं (Corona) संकट आहे. मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) तर कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूचे देखील नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे देशात महागाई हा एक वेगळा मुद्दा आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. या साऱ्या गोष्टी एकीकडे असताना राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मद्यप्रेमींसाठी दिलासादायक निर्णय घेतला होता. विदेशातून आयात होणाऱ्या दारुचा उत्पादन शुल्क (Excise duty) करात 50 टक्क्यांनी घट केली होती. त्यानंतर आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हिवाळ्यात (Winter) पुण्यात दारुविक्रीत कमालीची वाढ झालीय. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दारुविक्रीत प्रचंड वाढ झाल्याचं आकडेवारीतूनच स्पष्ट झालं आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये दारुच्या विक्रीत वाढ

खरंतर दरवर्षी हिवाळ्यात दारुविक्रीत वाढ होते. याआधीच्या आकडेवारीतून ते समोर आलंच आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हिवाळ्यात पडलेल्या थंडीने नोव्हेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यात दारुच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात देशी दारुची विक्री ही 3.7 टक्क्यांनी वाढलीय. तर विदेशी दारुची विक्री ही 4.2 टक्क्यांनी वाढलीय. विशेष म्हणजे बिअरच्या विक्रीत विक्रमी वाढ झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल 16.6 टक्क्यांनी बिअरच्या विक्रीत वाढ झाली. तर वाईनच्या विक्रीतही 11.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडे या सर्व आकडेवारींच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. या आकडेवारीनुसार हिवाळ्यात मद्यपानाचे प्रमाण नेहमीच्या तुलनेत वाढल्याचे पाहायला मिळतेय.

हेही वाचा : मुंबईसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी, जिनोम सिक्वेन्सिंगमधून महत्त्वपूर्ण माहिती उघड

गेल्यवर्षी आणि यावर्षीची आकडेवारी नेमकी काय सांगतेय?

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात देशी दारुची 25 लाख 56 हजार 916 लिटर इतकी विक्री झाली होती. तेच प्रमाण यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात 26 लाख 51 हजार 123 लिटर इथपर्यंत पोहोचले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी देशी दारुच्या विक्रीत 3.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तसेच गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात विदेशी दारुची 25 लाख 56 हजार 916 लिटर इतकी विक्री झाली होती. तेच प्रमाण या नोव्हेंबर महिन्यात 32 लाख 15 हजार 665 लिटरवर पोहोचलं आहे. याचाच अर्थ यावर्षी थंडीत विदेशी दारुच्या विक्रीत 4.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा : कित्ती गोड! आईचा मेकओव्हर पाहून बाळाची गोड प्रतिक्रिया, पाहा CUTE VIDEO

बिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 1 लाख 31 हजार 307 लिटर बिअर विकली गेली होती. तेच प्रमाण यावर्षी 36 लाख 40 हजार 865 लिटरवर पोहोचलं आहे. म्हणजेच बिअरच्या विक्रीत 16.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वाईनच्या विक्रीतही यावर्षी वाढ झालेली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 1 लाख 31 हजार 307 लिटर वाईन विकली गेली होती. यावर्षी पुण्यात 1 लाख 46 हजार 293 लिटर वाईन विकली गेली आहे. याचाच अर्थ हे प्रमण 11. 4 टक्क्यांनी वाढलं आहे.

First published:
top videos

    Tags: Liquor stock, Maharashtra News, Pune news