मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : किर्तनाची आवड आहे? तर भारती विद्यापीठात सुरू झालाय 'किर्तन डिप्लोमा कोर्स', कसा कराल अर्ज?

Pune : किर्तनाची आवड आहे? तर भारती विद्यापीठात सुरू झालाय 'किर्तन डिप्लोमा कोर्स', कसा कराल अर्ज?

भारती विद्यापीठ, पुणे

भारती विद्यापीठ, पुणे

पंढरीची वारी आणि किर्तन परंपरा हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पुण्यातील भारती विद्यापीठाने किर्तनाची आवड असणाऱ्यांसाठी Kirtan Diploma course सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रिया पुढच्याच महिन्यात सुरू आहे.

पुणे, 24 जून : मनोरंजन आणि त्यातूनच समाज प्रबोधन करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणून किर्तन या प्रकाराकडे बघितले जाते. महाराष्ट्रात वारकरी आणि नारदीय, अशा दोन किर्तन पद्धती महत्त्वाच्या मानल्या जातात. या किर्तन पद्धतींचा अभ्यास पारंपरिक पद्धतीने अनेक विद्यार्थी करीत असतात. त्यामुळे किर्तन पद्धतीचा अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्याला किर्तनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे. तसेच त्याला हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यापीठाचे (Bharati Vidyapeeth Deemed University) प्रमाणपत्र मिळावे. यासाठी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् किर्तन पदविका अभ्यासक्रमाला (Kirtan Diploma course) जुलै महिन्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी कळवली आहे. वाचा : Success Story : प्रमोशनसाठी 53 व्या वर्षी अनिल वायदंडेंनी दहावीची परीक्षा दिली; मिळाले 64 टक्के, नोकरी सांभाळत केला अभ्यास, पहा VIDEO A दर्जा असलेले विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या भारती विद्यापीठाने सदर अभ्यासक्रमाला सहा वर्षांपूर्वी यशस्वीरीत्या सुरुवात केली. आजवर एकूण 3 वर्गांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असून त्यात 50 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भावी काळाचा विचार करता किर्तन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणे हे अत्यंत महत्वाचे ठरेल. अभ्यासक्रमाची महत्वाची वैशिष्ट्ये ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही शिक्षण पद्धतीचा अवलंब असणारा हा अभ्यासक्रम एकूण 4 वर्षांचा आहे. कोणत्याही शाखेतून इयत्ता 12 उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची फी प्रती वर्ष फी रुपये 18000 इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याला वारकरी आणि नारदीय किर्तन या दोन्ही पद्धतींचा अभ्यास एकाच वेळी करता येतो. त्याबरोबरच अभंग, कीर्तन, आख्यान, माहात्म्य, संस्कृत आणि मराठी सुभाषिते, गीतेतील अध्याय, विविध वृत्तांचा अभ्यास तसेच संगीतातील विविध घटकांचा अंतर्भावदेखील या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. वाचा : राजकीय घडामोडी, पावसाळ्याच्या तोंडावर कोरोना बळावतोय; निष्काळजीपण येईल अंगलट अध्यापन कोण करणार? सर्वात महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय ख्यातीचे किर्तनकार चारुदत्त आफळे, लोक साहित्य आणि कलांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, प्रसिद्ध किर्तनकार गणेश महाराज भगत, योगीराज महाराज गोसावी, सचिन महाराज पवार, संतोष महाराज पायगुडे यांच्यासारख्या विद्वान, उच्चविद्याविभूषित, सुप्रसिद्ध किर्तनकार गुरुजनांद्वारा रितसर गुरुकुल पद्धतीने अध्यापन केले जाते.

गुगल मॅपवरून साभार...

अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती कशी मिळवाल? अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी spa.bharatividyapeeth.edu या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. चौकशीसाठी 020 25421032 किंवा 9860179188 या क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधू शकतात. बीव्ही (डीयू) स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, तळमजला, पूना कॉलेज ऑफ फार्मसी, भारती विद्यापीठ (विद्यापीठ मानले जाते) शैक्षणिक संकुल, पौड रोड, पुणे - 411 038 या पत्त्यावरही तुम्ही भेट देऊन माहिती घेऊ शकता.
First published:

Tags: Education, Pune, Wari

पुढील बातम्या