मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pune News : चेष्टा-मस्करीचं रूपांतर भांडणात, मित्रावरच केले चाकुने सपासप वार, हत्येनंतर पोलीस स्टेशन गाठत...

Pune News : चेष्टा-मस्करीचं रूपांतर भांडणात, मित्रावरच केले चाकुने सपासप वार, हत्येनंतर पोलीस स्टेशन गाठत...

Representative Image

Representative Image

Pune Crime News: पुण्यात मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. दोघांमध्ये सुरू असलेल्या मस्करीवरुन वाद वाढला आणि एकाने दुसऱ्यावर सपासर वार केले.

पुणे, 1 डिसेंबर : मित्रांच्या चेष्टा मस्करीतून झालेल्या वादाचा पर्यवसन खून करण्यापर्यंत गेल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. आज (1 डिसेंबर 2021) सकाळी फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीत ही घटना घडली आहे. कचरा आणि भंगार गोळा करायचं काम करणाऱ्या पाटील आणि यादव नावाच्या दोन मित्रांमध्ये दोन दिवसांपूर्वी (Clash between two youths) झालेल्या चेष्टामस्करी वरून वाद झालेला होता. आज पुन्हा सकाळी एस आर एम गुजराती शाळेजवळ कामाच्या ठिकाणी हे दोघे एकत्र आल्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि पाटील नावाच्या आरोपीने अमन यादव या त्याच्या मित्रावर चाकूने वार केले. (Youth stabbed by his friend over minor dispute)

हत्या करुन आरोपीने गाठलं पोलीस स्टेशन

हे वार केल्यानंतर कुठेही पळून न जाता त्याने थेट फरासखाना पोलीस स्टेशन गाठलं आणि आपण खून केला असल्याचे पोलिसांना सांगितले. हे सर्व ऐकून पोलीस स्टेशनमध्ये मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित प्रकाराची माहिती दिली.

वाचा : Mumbai: भरदिवसा घरातून तीन महिन्यांच्या बाळाचं अपहरण, मुंबईतील धक्कादायक घटना

रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

घटनास्थळी एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे पोलिसांना आढळून आला. त्यानंतर त्यांनी तातडीने अमन यादव याला ससून रुग्णालयात नेलं मात्र तिथे नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यानी ही घटनास्थळी भेट दिली.

गेल्या 15 दिवसांत 6 हत्या

पुण्यात खूनाचं सत्र गेल्या पंधरा दिवसांपासून थांबायचं नाव घेत नाहीये. गेल्या पंधरा दिवसांमध्ये पुण्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये सह जणांचा खून झाला आहे. यातील काही घटनांमधील आरोपी पोलिसांनी गजाआड केले तर काही प्रकरणांमध्ये आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र खुनासारखे गंभीर प्रकार रोखण्यामध्ये पोलिसांना अपयश येत असल्याचे चित्र आहे. रस्त्यावर होणारे खुनासारखे गंभीर प्रकार किंवा दोन दिवसापूर्वी गोळीबार करून करण्यात आलेला खून या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांसमोर गुन्हेगारांनी मोठ आव्हानं उभं केलं आहे.

वाचा : शाळेची घंटा वाजण्याआधीच हृदयाची धडधड थांबली; सांगलीत चिमुकलीचा दुर्दैवी अंत

गेल्या पंधरा दिवसात पुण्यात कात्रज परिसरात तीन वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तर फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खून झालेला होता. त्यानंतर आजची खुनाची सहावी घटना आहे. त्यामुळे हे खुनाच सत्र थांबवण्याच पोलिसांसमोर मोठ आव्हान उभं राहिलं आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Murder, Pune