मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात पावसाचा कहर, एकाचा मृत्यू; निसर्गाचं रौद्र रूप दाखवणारे धक्कादायक 4 Video

पुण्यात पावसाचा कहर, एकाचा मृत्यू; निसर्गाचं रौद्र रूप दाखवणारे धक्कादायक 4 Video

अचानक झालेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे.

अचानक झालेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे.

अचानक झालेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

पुणे, 30 सप्टेंबर : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच पुण्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पुणे शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला पाहायला मिळत आहे.

कालही पुणे शहरात दुपारच्या सत्रात तब्बल एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचलेला पाहायला मिळालं.

हवामान विभागाच्या वतीने पुढील आठवडाभर पाऊसाचा अंदाज देण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आणि मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची 1 ते 2 तीव्र सरी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आत्ता गेल्या अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या पाऊसाने शहरातील अनेक पेठांमध्ये रस्त्यांवर पाणी च पाणी पाहायला मिळत आहे

पुण्यात आज सुरू असलेल्या तुफान पावसामुळे येरवड्यात चालू रिक्षावर झाड पडून 1 व्यक्ती ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. झाड बाजुला काढण्याचं काम सुरू आहे. पुण्यातील शिवणेसह नाना पेठ चमडी गल्ली येथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. नाना पेठ चमडी गल्ली या ठिकाणी जोरदार पावसात गाड्या पडून वाहून जात असताना दिसत आहे.

First published:

Tags: Pune, Pune rain, Rain