मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Lockdown मध्ये गमावली नोकरी अन् पुण्यातील पती-पत्नीने सुरू केली चोरी, जिम ट्रेनर बनला चोर

Lockdown मध्ये गमावली नोकरी अन् पुण्यातील पती-पत्नीने सुरू केली चोरी, जिम ट्रेनर बनला चोर

Lockdown मध्ये गमावली नोकरी अन् सुरू केली चोरी, पुण्यातील जिम ट्रेनर बनला चोर

Lockdown मध्ये गमावली नोकरी अन् सुरू केली चोरी, पुण्यातील जिम ट्रेनर बनला चोर

Pune gym trainer start theft after lose job in lockdown: पुण्यातील जिम ट्रेनरने नोकरी गमावल्यानंतर चक्क चोरीचा मार्ग अवलंबला. आता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे, 11 डिसेंबर : कोरोनाच्या काळात (Corona Pandemic) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उपजीविकेची साधन नसल्याने आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यामुळे उपजीविका भागवण्यासाठी अनेकांनी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार आता पुण्यातून समोर आला आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावल्याने पुण्यातील पती आणि पत्नीने चक्क चोरीचा मार्ग अवलंबला आहे. (Pune gym trainer start theft with wife after lost job in corona pandemic)

पुण्यातल्या समर्थ पोलीस स्टेशनच्या (Pune Samarth Police Station) पोलिसांनी असाच एक गुन्हा उघडकीस आणला आहे. व्यवसायाने जिम ट्रेनर असलेल्या बाळासाहेब हांडे या व्यक्तीने समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परमार ज्वेलर्समध्ये बायकोच्या मदतीने दोन तोळ्याचा मंगळसूत्राची चोरी केली होती. या प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बाळासाहेब भांडे याला अटक करण्यात आली आहे.

वाचा : Pune: महिला आणि लहान मुलांकडून घरफोडी, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

कोरोच्या काळात नोकरी गेल्यामुळे उदरनिर्वाहासाठी काय करायचं असा प्रश्‍न पडल्यामुळे पत्नीच्या सोबतीनं चोरी करायला सुरुवात केली असं बाळासाहेब हांडे यांना तपासात सांगितल आहे. आरोपी बाळासाहेब हांडे याला अटक करण्यात आली आहे. मात्र त्याच्या पत्नीला सहा महिन्यांचे मूल असल्यामुळे तिला केवळ नोटीस देण्यात आली आहे. या जोडीने पोटभरण्यासाठी आतापर्यंत दोन ते तीन ठिकाणी अशाच पद्धतीने चोरी केली असल्याचं तपासात समोर आलं आहे.

वाचा : पुण्यात थेट म्हाडालाच गंडवलं; देशपांडे आणि गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील नामांकित सराफांना गंडा; CCTV च्या मदतीने महिला अटकेत

पुण्यातील नामांकित ज्वेलर्सला हातचलाखीने गंडा (Pune woman stole gold from reputed jewelers) घालणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आरोपी महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेची ज्यावेळी चौकशी करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यातील चंदुकाका सराफ अँड सन्स, पुन. ना. गाडगीळ या नामांकित ज्वेलर्समध्ये आरोपी महिलेने हातचलाखीने चोरी केल्याचं उघड झालं आहे. आरोपी महिलेचं नाव पुनम परमेश्वर देवकर असे असून तिच्याकडून पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे. ज्वेलर्समधील काऊंटरवर असलेल्या व्यक्तीला सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगून त्यानंतर त्या व्यक्तीचे लक्ष विचलीत करुन सोन्याच्या अंगठी ऐवजी बनावट अंगठी ठेवत असे.

First published:

Tags: Cctv footage, Crime, Pune